इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट, कोलकाता येथे सांख्यिकी विषयातील विविध अभ्यासक्रमांमध्ये खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत-

  • तीन वर्षे कालावधीचा स्टॅटिस्टिक्स विषयातील ऑनर्ससह पदवी अभ्यासक्रम.
  • तीन वर्षे कालावधीचा गणित विषयातील ऑनर्ससह पदवी अभ्यासक्रम.
  • दोन वर्षे कालावधीचा स्टॅटिस्टिक्स विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
  • दोन वर्षे कालावधीचा एमएस क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स हा पदव्युत्तर अभ्यासक्रम.
  • दोन वर्षे कालावधीचा क्वालिटी मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम.
  • दोन वर्षे कालावधीचा एमएस इन लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फर्मेशन सायन्स या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
  • दोन वर्षे कालावधीचा एमटेक इन कॉम्प्युटर सायन्स हा पदव्युत्तर अभ्यासक्रम.
  • दोन वर्षे कालावधीचा एमटेक इन कॅ्रप्टॉलॉजी अ‍ॅण्ड सिक्युरिटी अभ्यासक्रम.
  • दोन वर्षे कालावधीचा एमटेक इन क्वालिटी, रिलाएबिलिटी अ‍ॅण्ड ऑपरेशन्स रिसर्च विषयक अभ्यासक्रम.
  • एक वर्षांचा कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन विषयातील पदविका अभ्यासक्रम.
  • एक वर्षांचा स्टॅटिस्टिकल मेथडस् अ‍ॅण्ड अ‍ॅनलिटिक्स या विषयातील पदविका अभ्यासक्रम.

विशेष सूचना- वरील शैक्षणिक अभ्यासक्रमाशिवाय इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्टॅटिस्टिक्समध्ये स्टॅटिस्टिक्स, गणित, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स, क्वालिटी, रिलायबिलिटी अ‍ॅण्ड ऑपरेशन्स मॅनेजमेंट, जिऑलॉजी, लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन सायन्स, बायोलॉजिकल सायन्स यासारख्या विषयांमध्ये संशोधनपर फेलोशिप्स उपलब्ध असून त्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या संशोधन कालावधीत संशोधनपर पाठय़वृत्ती देय असेल.

निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची आयएसआय अ‍ॅडमिशन टेस्ट ही प्रवेश पात्रता परीक्षा १३ मे २०१८ मे रोजी देशांतर्गत निवड परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.

अर्जदारांची प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्टॅटिस्टिक्स, कोलकाताच्या संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह पाठवायचे शुल्क – प्रवेश अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी १०० रु. (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ५०० रु.) भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट, कोलकाताची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या  https://www.isical.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०१८ आहे.