गुजरातमधील भाजप नेत्यांचे जोरदार प्रत्युत्तर

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
Sanjay Raut Sanjay Nirupam and Prabhakar More
“…यांच्यापेक्षा आमचा प्रभाकर मोरे बरा”, आशिष शेलारांची कवितेमधून राऊत आणि निरुपम यांच्यावर टीका

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना मंगळवारी गुजरातच्या भाजप नेत्यांनी लक्ष्य केले. ‘‘अखिलेश यांच्यापेक्षा गाढव निष्ठावान आहे,’’ असा टोला लगावत भाजप नेत्यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

अभिनेते अमिताभ बच्चन हे गुजरातच्या पर्यटनाचे सदिच्छादूत आहेत. गुजरातच्या पर्यटनस्थळांना भेट देण्याचे आवाहन करणारी त्यांची जाहिरात वाहिन्यांवर दाखविण्यात येते. त्याचा संदर्भ देत अखिलेश यांनी ‘‘गुजरातच्या गाढवांची जाहिरात करू नका, हे माझे या शतकातील सर्वात मोठय़ा महानायकाला सांगणे आहे,’’ असे वक्तव्य रायबरेलीतील प्रचारसभेत सोमवारी केले होते. मुलायमसिंग यादव यांच्यासोबतच्या सत्तासंघर्षांचा दाखला देत गुजरातमधील भाजप नेत्यांनी अखिलेश यांना लक्ष्य केले. ‘‘अखिलेश यांच्यापेक्षा गाढव निष्ठावान आहे. अखिलेश यांनी गाढवाकडून निष्ठा शिकायला हवी,’’ अशी टीका गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनी केली. ‘‘अखिलेश यादव यांनी गुजरातचा अपमान केला आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यांना पराभव दिसू लागला आहे,’’ असेही वाघानी म्हणाले. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आघाडी करणाऱ्या काँग्रेसचे अखिलेश यादव यांच्या वक्तव्याला समर्थन आहे का, असा सवालही त्यांनी केला.