करोना संसर्ग देशात कमी झाला आहे. मात्र करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञानी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षीही अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही अमरनाथ यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही यात्रा रद्द करण्याची घोषणा केली. दरम्यान, भाविकांना २८ जूनपासून ऑनलाइन दर्शन घेता येणार आहेत.

भाविकांना बाबा बर्फानी ऑनलाइन दर्शन गेता येणार आहेत. हिमालयाच्या उंच उंच भागात ३८८० मीटर उंचीवर असलेल्या भगवान शिवच्या गुफा मंदिरात ५६ दिवसाठी यात्रा २८ जून रोजी पहलगाम व बालटालमार्गे सुरू होणार होती आणि २२ ऑगस्टला संपणार होती.

हेही वाचा- सर्व विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवारांचा अजेंडा- नवाब मलिक

यापूर्वी एप्रिल महिन्यात अमरनाथजी श्राईन बोर्डानं पवित्र गुफेची यात्र रद्द करणार असल्याचं म्हटलं होती. यासंदर्भात पत्रकही जारी करण्यात आलं होतं. परंतु काही वेळानंचं जम्मू काश्मीर माहिती संचालनालयानं यात्रा रद्द करण्याचा आदेश मागे घेतला होता. दरवर्षी जून महिन्यात या ठिकाणी अमरनाथ यात्रेचं आयोजन करण्यात येतं. देशाच्या तसंच जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात.

थेट प्रक्षेपण करणार

यावर्षी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी भाविकांसाठी बोर्डानं सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीचं थेट प्रक्षेपण आणि व्हर्च्युअल दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यात्रा पार पडणार नसली तरी प्रथेप्रमाणे या ठिकाणी पारंपारिक विधी पाडले जाणार असल्याचं जम्मू काश्मीरच्या प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.