News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर आणखी एक विक्रम

अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरील विक्रम मोडला

पंतप्रधान मोदी आज ७० वर्षांचे झाले. या वयातही मोदी पूर्णपणे फिट आणि पूर्णवेळ कामात व्यस्त असतात. योगा, फिटनेसला मोदींकडून विशेष प्राधान्य दिले जाते. या गोष्टीमुळे मोदी इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. भाजपाचे सर्वात प्रदीर्घकाळ असलेले पंतप्रधान म्हणून पंतप्रधान मोदींनी विक्रम केला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. तसेच, सर्वात जास्त काळापर्यंत पंतप्रधान पदावर असलेले गैरकाँग्रेसी नेते म्हणून देखील पंतप्रधान मोदी यांनी विक्रम केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी हे सर्वात प्रदीर्घकाळ गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. तर, सलग २ हजार २५६ दिवस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावर होते. १९ मार्च १९९८ रोजी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले होते. जे सलग २२ मे २००४ पर्यंत पंतप्रधान पदावर होते. त्यांचा पहिला कार्यकाळ १९ मार्च १९९८ ते १३ ऑक्टोबर १९९९ पर्यंत होता. तर दुसरा कार्यकाळ १३ ऑक्टोबर ते २२ मे २००४ पर्यंत होता.

तर, सद्यस्थितीस देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असलेले नरेंद्र मोदी हे २ हजार २६० दिवसांपासून आजतागायत पंतप्रधान पदावर कायम आहेत. यामुळे सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावर राहिलले पहिले गैरकाँग्रेसी व भाजपा नेता म्हणून त्यांच्या नावे विक्रम झाला आहे. नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ २६ मे २०१४ पासून सुरू झाला असून, तो अद्यापही सुरूच आहे. २०१४ मध्ये भाजपा प्रचंड बहुमत मिळवत देशात सत्तेत आली होती. त्यानंतर २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यांचा पहिला कार्यकाळ २०१९ मध्ये संपला होता. मात्र, पुन्हा एकदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवत सत्ता मिळवली आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले.

स्वातंत्र्यानंतर १९४७ पासून ते २०२० पर्यंत देशाला १५ पंतप्रधान मिळाले आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम आहे. ते ६ हजार १३० दिवस पंतप्रधान पदावर होते.

जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधी ५ हजार ८२९ दिवस पंतप्रधान पदावर होत्या. २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ म्हणजेच ११ वर्षे ५९ दिवस त्या सलग पंतप्रधान पदावर होत्या. त्यानंतर दुसऱ्यांदा १४ जानेवारी १९८० पासून ते ३१ ऑक्टोबर १९८४ पर्यंत पंतप्रधान पद त्यांनी सांभाळले.

इंदिरा गांधी यांच्या नंतर मनमोहन सिंग हे सर्वाधिक काळापर्यंत पंतप्रधान पदावर होते. ते यूपीए -१ व यूपीए -२ सरकारमध्ये २००४ ते २०१४ पर्यंत म्हणजेच १० वर्षे पंतप्रधान होते. त्यांच्या नावावर ३ हजार ६५६ दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 3:21 pm

Web Title: another record in the name of prime minister narendra modi msr 87
Next Stories
1 १५० पेक्षा जास्त नद्या आणि तीन समुद्रांचे पाणी घेऊन अयोध्येत पोहोचले ‘ते’ दोन भाऊ
2 “राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी दिलंय योगदान”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर
3 पंजाब हादरले; विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत ८६ जणांचा मृत्यू
Just Now!
X