News Flash

बिहार बोर्डाचा सावळागोंधळ; बारावीच्या विद्यार्थ्याला ३५ पैकी ३८, तर गैरहजर विद्यार्थिनीला १८ गुण

बिहारमधील बारावी बोर्डाच्या परीक्षेत हा प्रकार घडला. मात्र असे प्रकार सवयींचेच असल्याचे काहींनी सांगितले.

प्रातिनिधिक फोटो

नुकताच विविध राज्यातील दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. तर अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुणही मिळाले. पण बिहारमधील बारावी बोर्डाच्या परीक्षेत एक अजब प्रकार घडला.

बिहारच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत गणिताच्या पेपरमध्ये एका विद्यार्थ्याला चक्क ३५ पैकी ३८ गुण देण्यात आले. गणिताच्या पेपरमध्ये थेअरी प्रश्न हे ३५ गुणांसाठी विचारण्यात आले होते. आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नही ३५ गुणांसाठी विचारण्यात आले होते. या पेपरमध्ये बिहारच्या अरवाल भागातील भीम कुमार या विद्यार्थ्याला थेअरी प्रश्नांमध्ये चक्क ३५ पैकी ३८ गुण देण्यात आले आहेत. हि गोष्ट येथेच थांबली नसून याच विद्यार्थ्याला त्याच पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये ३५ पैकी ३७ गुण देण्यात आले आहेत.

याशिवाय, वैशाली जिल्ह्यातील एका विद्यार्थीनीलाही असाच पण थोडा वेगळ्या प्रकारचा अनुभव आला. त्या विद्यार्थिनीला जीवशास्त्र या विषयात १८ गुण देण्यात आले. मात्र ती विद्यार्थिनी या परीक्षेला बसलीच नसल्याचे तिने सांगितले.

दरम्यान, या सावळ्यागोंधळाबाबत विचारले असता विद्यार्थी अजिबात अचंबित नसल्याचे दिसून आले. असे प्रकार सवयींचेच असल्याचेही काहींनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 3:22 pm

Web Title: bihar 12th board exam 38 out of 35 marks bhim kumar
टॅग : Bihar
Next Stories
1 १५२- १३६, जागावाटपासाठी शिवसेनेचा फॉर्म्यूला; भाजपा ‘राजी’ होणार?
2 ‘एनडीए’तील वाद मिटवण्यासाठी भाजपाचा हा गेम प्लान
3 मुस्लिमांनी काँग्रेसवर विश्वास ठेवू नये; प्रणवदांच्या संघवारीनंतर ओवेसी बरसले
Just Now!
X