बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरूच आहे. आत्तापर्यंत १६५ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये ८३ जागांवर एनडीएने विजय मिळवला आहे. ८३ पैकी ४७ जागांवर भाजपा, २९ जागांवर जदयू तर इतर दोन मित्रपक्षांनी सात जागांवर विजय मिळवला आहे. एनडीए ३९ जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीने ७६ जागांवर विजय मिळवला आहे. त्यापैकी ५२ जागा राजदने १२ जागा काँग्रेसने तर १२ जागा डाव्यांनी जिंकल्या आहेत. महाआघाडी ३७ जागांवर आघाडीवर आहे. एमआयएमने चार जागांवर विजय मिळावला आहे. बसपा आणि लोजपाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. तर अपक्षांनी एका जागेवर विजय मिळवला आहे.

maval, panvel, chinchwad
पिंपरी : ‘मावळ’चा खासदार चिंचवड, पनवेलकर ठरविणार?
Rs.100 crore seized every day
Elections 2024: निवडणूक आयोगाकडून विक्रमी ४,६५० कोटी रुपये जप्त
maval lok sabha constituency 14 polling stations sensitive
मावळमध्ये किती मतदान केंद्र संवेदनशील?
neha sharma daughter of congress mla
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे काँग्रेस आमदाराची लेक, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? वडील म्हणाले…

Live Blog

22:45 (IST)10 Nov 2020
बिहारमध्ये १६५ जागांचे निकाल जाहीर


बिहार निवडणूक निकालाचे एकूण १६५ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये ८३ जागांवर एनडीएने विजय मिळवला आहे. ८३ पैकी ४७ जागांवर भाजपा, २९ जागांवर जदयू तर इतर दोन मित्रपक्षांनी सात जागांवर विजय मिळवला आहे. एनडीए ३९ जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीने ७६ जागांवर विजय मिळवला आहे. त्यापैकी ५२ जागा राजदने १२ जागा काँग्रेसने तर १२ जागा डाव्यांनी जिंकल्या आहेत. महाआघाडी ३७ जागांवर आघाडीवर आहे. एमआयएमने चार जागांवर विजय मिळावला आहे. बसपा आणि लोजपाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. तर अपक्षांनी एका जागेवर विजय मिळवला आहे.

22:32 (IST)10 Nov 2020
बिहारच्या १४२ जागांचे निकाल समोर


बिहारच्या १४२ जागांचे निकाल आता समोर आले आहेत. यामध्ये भाजपाप्रणित एनडीएला ७२ जागा मिळाल्या आहेत. या ७२ पैकी ३९ जागांवर भाजपा, जदयूने २७ जागांवर, तर इतर दोन मित्र पक्षांनी ६ जागांवर विजय मिळवला आहे. एनडीएने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे महाआघाडीने ६५ जागा जिंकल्या आहेत. यापैकी ४५ जागांवर राजद, आठ जागांवर काँग्रेस आणि डाव्यांनी १२ जागांवर विजय मिळवला आहे. महाआघाडीने ४८ जागांवर आघाडी घेतली आहे. एमआयएमला ३ जागांवर, बसपाला एका जागेवर तर अपक्षांना एका जागेवर विजय मिळाला आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.

22:18 (IST)10 Nov 2020
विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं, तेजस्वी यादव यांचा आरोप

विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं असा आरोप राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आता केला आहे. इतकंच नाही तर नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेवर दबाव टाकत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हीच तक्रार घेऊन राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं एक शिष्ट मंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहचलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे मतमोजणीच्या प्रक्रियेवर दबाव टाकत आहेत असा आरोप या शिष्टमंडळाने केला आहे.

21:50 (IST)10 Nov 2020
बिहार निवडणूक आत्तापर्यंत १०३ जागांचे निकाल हाती

बिहारमधल्या १०३ जागांचे निकाल लागले आहेत. यामध्ये एनडीएने ५४ जागा जिंकल्या आहेत. ५४ पैकी ३२ जागा भाजपाने १९ जागा जदयूने तर HAM ने एक जागा जिंकली आहे. ६९ जागी एनडीएची आघाडी आहे. तर महाआघाडीने ४४ जागी विजय मिळवला आहे. यापैकी २९ जागी राजदने, ७ जागी काँग्रेसने आणि डाव्यांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. महाआघाडीनेही ६९ जागी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सत्तेसाठीची रस्सीखेच दोहोंमध्येही पाहण्यास मिळते आहे.

21:23 (IST)10 Nov 2020
बसपाला एका जागेवर मिळाला विजय

बिहार निवडणूक निकालात आत्तापर्यंत जे ९३ निकाल हाती आले आहेत. त्यात भाजपा आणि राजद यांच्यात चुरस पाहण्यास मिळते आहे. दरम्यान बसपाला एक जागा जिंकण्यात यश आलं आहे अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी होत असल्याने निकाल समोर येण्यास उशीर लागतो आहे. 

21:16 (IST)10 Nov 2020
बिहारमधल्या ९२ जागांचे निकाल जाहीर

बिहारमधल्या ९२ जागांचे निकाल जाहीर. एकूण २४३ जागांसाठी मतदान झालं आहे. त्यापैकी ९२ जागांचे निकाल आता समोर आले आहेत. ज्यापैकी भाजपाला २८ जागी, राजदला २५ जागी तर जदयूला १७ जागी विजय मिळाला आहे. भाजपा आणि राजद या दोन्ही पक्षांमध्ये टफ फाइट पाहण्यास मिळते आहे. दरम्यान काँग्रेसला ७, सीपीआय एमएल ला ६, एमआयएमला २ जागांवर यश मिळालं आहे. तर सीपीआय, सीपीआय एम, HAM आणि अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला आहे. 

#BiharElections: Results declared for 92 out of the total 243 seats.

BJP wins 28, RJD- 25, JD(U)-17, Congress- 7, CPI(M-L)- 6, VIP- 2, AIMIM- 2, and CPI, CPI(M), HAM(S) & Independent 1 each. pic.twitter.com/qdPLOh4i9G


— ANI (@ANI) November 10, 2020

21:11 (IST)10 Nov 2020
बिहारच्या ७४ जागांचे निकाल जाहीर

बिहार निवडणुकीतले ७४ जागांचे निकाल समोर आले आहेत. ज्यामध्ये भाजपाला २२ जागा, राजदला २० जागा तर जदयूला १३ जागा जिंकण्यात यश मिळालं आहे. काँग्रेसने ७, सीपीआय एमलला पाच, विकसनशील इन्सान पार्टीला दोन, एमआयएम सीपीआय एम, HAM आणि अपक्ष यांना प्रत्येकी एक जागेवर विजय मिळाला आहे. 

 

 

#BiharElectionResults2020: Results declared for 74 out of the total 243 seats.

BJP 22, RJD wins 20, JD(U) 13, Congress 7, CPI(M-L) 5, VIP 2 and AIMIM, CPI, CPI(M), HAM(S) & Independent 1.

NDA leading on 126 seats
Mahagathbandhan on 110 seats
AIMIM on 5 seats
BSP on 1 seats pic.twitter.com/LtBKHYT1sn


— ANI (@ANI) November 10, 2020

20:08 (IST)10 Nov 2020
BIHAR ELECTION : टफ फाइट! महाआघाडी ११६ तर एनडीए १२१ जागांवर आघाडीवर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात काय चित्र स्पष्ट होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. आता जे कल हाती येत आहेत त्यावरुन महाआघाडी आणि एनडीए यांच्यात चुरशीची लढाई दिसून येते आहे. कारण आता भाजपाप्रणित एनडीएने १२१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाआघाडीने ११६ जागांवर आघाडी घेतली आहे. एकूण २४३ जागांपैकी ३१ जागांचे निकाल लागले आहेत. यामध्ये १० जागांवर भाजपा, राजद ८ जागांवर तर जदयू ६ जागांवर विजयी झाली आहे.

19:36 (IST)10 Nov 2020
नितीश कुमारांचा पराभव लांबणीवर पडतोय इतकंच, सत्ता आमचीच येणार-मनोज झा

बिहार निवडणुकीच्या निकालात नेमकी सत्ता कुणाला मिळणार हे चित्र स्पष्ट होण्यासाठी विलंब लागतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊन मतमोजणी केली जाते आहे त्यामुळे हा वेळ लागतो आहे. अशात राजदचे खासदार मनोज झा यांनी बिहारमध्ये आमचीच सत्ता येणार असा दावा केला आहे. एवढंच नाही तर निवडणूक निकाल प्रक्रिया लांबल्याने नितीश कुमार यांचा पराभव काहीसा लांबणीवर पडेल. मात्र इथल्या जनतेला परिवर्तन हवं आहे आणि ते परिवर्तन घडेल असंही झा यांनी म्हटलं आहे.

19:36 (IST)10 Nov 2020
बिहार निवडणूक निकालावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

बिहार निवडणुकीचे अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्र होणार असून सध्याची आकडेवारी पाहता बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं.

“मी जी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली त्यानुसार स्वत: पंतप्रधान यामध्ये खूप रस घेत होते. यामुळे एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते. यामुळे तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

19:35 (IST)10 Nov 2020
काँग्रेस उमेदवार लव्ह सिन्हा पिछाडीवर
19:30 (IST)10 Nov 2020
"तेजस्वी यादव यांच्यामुळे युवा वर्गाला मिळणार प्रेरणा"

तेजस्वी यादव यांचं शरद पवार यांनी कौतुक केलं आहे. त्यांच्यामुळे युवा वर्गाला प्रेरणा मिळेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

17:01 (IST)10 Nov 2020
"आम्ही सगळीकडून माहिती घेतलीये, बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार येणार हे निश्चित"

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीची घसरण झाली आहे. सुरूवातीला १२४ जागांवर पुढे असलेली महाआघाडी सध्या १०४ जागी पुढे आहे. दरम्यान, निकालावर राष्ट्रीय जनता दलानं भाष्य केलं आहे. "आम्ही सर्व मतदारसंघातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत आणि सर्व जिल्ह्यांमधून मिळालेल्या माहितीप्रमाणे निकाल आमच्या बाजूनेच आहे. रात्री उशिरा मतमोजणी संपेल. महाआघाडीचं सरकार येणार हे निश्चित आहे. बिहारने सत्तांतर केलं आहे. सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्रावरच राहावं," असं राजदने म्हटलं आहे.

16:00 (IST)10 Nov 2020
पहिला निकाल आला... दरभंगा मतदारसंघातून राजद उमेदवार विजयी

बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवारांने विजय मिळवला आहे. राजदचे ललित यादव दरभंगा ग्रामीण मतदारसंघातून विजयी झाले. दुसरीकडे एनडीएने बहुमताची आघाडी कायम ठेवली आहे. एनडीए १२९ जागी आघाडीवर आहे. ७३ ठिकाणी भाजपा, ४९ ठिकाणी जदयू, व्हीआयपी ५, तर २ ठिकाणी हमचे उमेदवार आघाडीवर आहेत. महाआघाडी १०३ जागांवर आघाडीवर आहेत. राजद ६४, काँग्रेस २०, तर डावे १८ जागी आघाडीवर आहेत.

15:20 (IST)10 Nov 2020
एनडीएला स्पष्ट बहुमत?; रात्रीपर्यंत येणार अंतिम निकाल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. सुरुवातीच्या तासाभरात महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारली. मात्र, हे कल हळूहळू बदल गेले. दुपारी तीनपर्यंत एनडीएने महाआघाडीला पिछाडीवर टाकत आघाडी घेतली. यात ७३ ठिकाणी भाजपा आघाडीवर आहे. तर जदयू ४९, व्हीआयपी ५ व हम एका जागेवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी सध्या १०५ जागांवर आघाडी आहे. राजदचे ६७ उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसने २०, तर डाव्यांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. बसपा आणि एमआयएमचे प्रत्येकी दोन उमेदवार आघाडीवर आहेत. बहुमतांसाठी १२२ जागांची आवश्यकता असून, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र, अंतिम निकालानंतर हेच चित्र कायम राहणार का हा प्रश्न आहे.

15:13 (IST)10 Nov 2020
जदयूच्या कार्यालयाबाहेर दिवाळी

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. एनडीएला स्पष्ट कौल मिळताना दिसत आहे. त्यामुळे जदयूच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद साजरा केला.

14:06 (IST)10 Nov 2020
एनडीए १२७, महाआघाडीची १०६ जागांवर आघाडी

मतमोजणीच्या ३५व्या फेरी अखेर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएनं वर्चस्व राखल्याचं दिसत आहे. एनडीए सध्या १२७ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. तर महाआघाडी १०६ जागांवर आघाडीवर आहे.

13:58 (IST)10 Nov 2020
१ कोटींपेक्षा जास्त मतांची मोजणी

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. आतापर्यंत एक कोटींपेक्षा अधिक मतांची मोजणी झाली असल्याची माहिती आयोगानं दिली.

13:47 (IST)10 Nov 2020
८९ जागांवरील निकाल ठरवणार कुणाचे येणार सरकार

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. जवळपास २५ पेक्षा अधिक फेऱ्या पार पडल्या आहेत. यात एनडीएला स्पष्ट मिळताना दिसत आहे. मात्र, बिहारमधील ८९ जागांवरील निकाल सरकार ठरवणार आहेत. ८९ जागांवर प्रचंड अटीतटीची लढत सुरू आहे. सात जागांवर केवळ २०० मतांचं अंतर आहे. २३ जागांवरील उमेदवार ५०० मतानीच आघाडीवर आहेत. तर ४९ जागांवरील उमेदवार १००० मतांनी पुढे आहेत.

12:27 (IST)10 Nov 2020
एनडीए स्पष्ट बहुमताच्या पुढे... जदयूला पछाडत भाजपाची मुसंडी

निवडणूक आयोगाकडून सध्याचे कल जाहीर करण्यात आले आहेत. २४३ मतदारसंघातील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या एनडीए १२७ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजपा ७३, जदयू ४७, तर व्हीआयपी पक्षाचे ७ उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे महाआघाडी १०० ठिकाणी आघाडीवर आहे. यात राजद ६१, काँग्रेस २०, डावे १९ जागांवर आघाडीवर आहेत.

11:48 (IST)10 Nov 2020
महाआघाडीची घसरगुंडी; एनडीएने घेतली आघाडी

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीनं मोठी झेप घेतली होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये घसरण झाल्याचं दिसून येत आहे. आताच हाती आलेल्या कलांनुसार एनडीए सध्या १२५ जागी आघाडीवर आहे. यात भाजपा ७० जागा, जदयू ४८, व्हीआयपी ६, तर हम एका जागेवर आघाडीवर आहे. महाआघाडीने सध्या १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. यात राजद ६२, काँग्रेस २० तर डावे १९ जागांवर आघाडीवर आहे.

11:46 (IST)10 Nov 2020
मध्य प्रदेश पोटनिवडणूक निकाल: भाजपा-काँग्रेसमध्ये कोणाची सरशी? जाणून घ्या…

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना मध्य प्रदेशातही २८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले. वाचा सविस्तर बातमी...

11:44 (IST)10 Nov 2020
उत्तर प्रदेश, गुजरात पोटनिवडणूक: कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर जाणून घ्या…

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबरोबरच मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडेही सगळयांचे लक्ष आहे. मध्य प्रदेशात २८ तर उत्तर प्रदेशात सात आणि गुजरातमध्ये विधानसभेच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपा गुजरात आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यात चांगली कामगिरी करेल, असा अंदाज आहे. वाचा सविस्तर बातमी..

11:42 (IST)10 Nov 2020
मतमोजणी सुरु असतानाच नितीश कुमार यांच्या जेडीयूने मान्य केला पराभव

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने पराभव मान्य केला आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने अनेक मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. पण आता भाजपा प्रणीत एनडीए आणि महाआघाडीमधील अंतर बरचं कमी झालं आहे. वाचा सविस्तर बातमी 

11:21 (IST)10 Nov 2020
एनडीए १२९ जागांवर आघाडी तर महाआघाडी पिछाडीवर

निवडणुकांचे कल सातत्यानं बदलत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या एनडीनं १२९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाआघाडीची पिछेहाट झाली असून ते ९८ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. 

10:39 (IST)10 Nov 2020
एनडीए आघाडीवर; महाआघाडी पिछाडीवर

१८९ जागांचे कल समोर येत आहेत. एनडीए ९७ जागांवर आघाडीवर असून, भाजपाने ५३ मतदारसंघात आघाडी घेतली आहे. जदयूचे ३९ उमेदवार आघाडीवर आहेत. महाआघाडी ८२ जागांवर आघाडीवर आहे. यात राजद ५४, काँग्रेस १४ आणि डावे १४ जागांवर पुढे आहे.

10:27 (IST)10 Nov 2020
महाआघाडी-एनडीए, कोण किती जांगावर आघाडीवर?

मतमोजणीच्या काही फेऱ्या पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या माहिती प्रमाणे २४३ जागांपैकी १६१ जागांचे कल हाती येताना दिसत आहेत. यात एनडीए ८१ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजपा ४२, जदयू ३४ विकसनशील इन्सान पार्टी ५ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी ७५ जागांवर आघाडीवर आहे. यात राजदने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १३ व डावे ११ जागांवर आघाडीवर आहेत. बसपा एका जागेवर आघाडीवर आहे. लोजपा दोन, एमआयएमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.

10:01 (IST)10 Nov 2020
बिहारमध्ये तेजस्वीपर्व सुरू होईल; संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले,"निकाल पूर्ण यायचे आहेत. जे कल पाहिले आहेत. त्यावरून एका तरुण नेत्यानं. त्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन जी ताकत उभी केली आहे. आता अटीतटीची लढत आहे. मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल. जेव्हा संपूर्ण निकाल हाती येईल, तेव्हा लोकं जंगल राज विसरलेले असतील आणि मंगलराज सुरू झालेलं असेल," असं संजय राऊत म्हणाले.

09:51 (IST)10 Nov 2020
तेजस्वी यादव आघाडीवर

महाआघाडीचं नेतृत्व करणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर दरभंगातून भाजपाचे उमेदवार संजय सरावगी ९०० मतांनी पुढे आहेत. बांकेपूरमधून लव सिन्हा यांनी बढत घेतली आहे.

09:41 (IST)10 Nov 2020
सुरूवातीच्या कलांमध्ये अटीतटीची लढत

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, महाआघाडी व एनडीए यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे. सध्या महाआघाडी १२४ जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीएने १०७ जागांवर आघाडी घेतली आहे. 

09:10 (IST)10 Nov 2020
महाआघाडीने ९५ जागांवर घेतली आघाडी

मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरूवातीच्या काही तासांतच राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांच्या महाआघाडीनं तब्बल ९५ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपा-जदयू प्रणित एनडीए ७७ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहे.

09:05 (IST)10 Nov 2020
तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी

बिहारमध्ये मतमोजणी सुरू आहे. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीनं आघाडी घेतली आहे. सुरूवातीच्या कल हाती येताच राजदच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. 

08:48 (IST)10 Nov 2020
मतमोजणी केंद्रावरील दृश्य

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, पाटणातील मतमोजणी केंद्रावरील हे दृश्य.

08:46 (IST)10 Nov 2020
प्राथमिक फेऱ्यांमध्ये महाआघाडी आघाडीवर

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीच्या काही फेऱ्यानंतर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस प्रणित महाआघाडीने आघाडी घेतली आहे. महाआघाडी ७५ जागांवर पुढे आहे. तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए ५२ जागांवर आघाडीवर आहे.

08:07 (IST)10 Nov 2020
मतमोजणीला सुरूवात

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. बिहार विधानसभेची सदस्यसंख्या २४३ असून, बहुमतासाठी १२२ जागां आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येक जिल्ह्यात तीन मतमोजणी केंद्र ठेवण्यात आले आहेत.

08:00 (IST)10 Nov 2020
लॉकडाउन, बेरोजगारीची प्रतिक्रिया उमटणार?

देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केला होता. त्यामुळे देशभरातील विविध शहरात स्थलांतरित झालेल्या बिहारमधील मजुरांचे प्रचंड हाल झाले. त्याचबरोबर घरी गेल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न बिहारमध्ये निर्माण झालेला दिसला. लॉकडाउन आणि त्यानंतर उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत सरकारनं मदत न केल्याचा सूर प्रचारादरम्यान उमटला होता. त्यामुळे या नाराजीचा फटका नितीश कुमार यांना बसू शकतो, अशी चर्चा सुरू होती. सरकारविरोधातील रोष कितपत मतदान यंत्रातून उमटतो, हे बघणंही औत्सुक्याचं असणार आहे.

07:55 (IST)10 Nov 2020
नितीश कुमारांची शेवटची निवडणूक?

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडलं. तिन्ही टप्प्यातील प्रचारात आरोपांची चिखलफेक होतानाही बिहारमध्ये दिसून आलं. विशेषतः शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी नितीश कुमार यांनी शेवटची निवडणूक असल्याचं सांगत 'भावने'चं कार्ड खेळलं होतं. त्याचा काही परिणाम दिसून येणार का? याकडेही मतदारांचं लक्ष असणार आहे.

07:51 (IST)10 Nov 2020
मतदानोत्तर चाचण्यांनी सत्तांतराचा कौल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या ‘एनडीए’विरोधात राजदप्रणीत काँग्रेस, डाव्या पक्षांच्या महाआघाडीने दमदार आव्हान उभे केले. प्रत्येक टप्प्यागणिक लढत चुरशीची होणार, हे स्पष्ट झाले. मतदानोत्तर चाचण्यांनी सत्तांतराला कौल दिला आहे.