News Flash

मसुद अझहरला ‘जी’ म्हणणं भोवणार, राहुल गांधींविरोधात भाजपाकडून तक्रार दाखल

या तक्रारीमुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे

मसुद अझहरला ‘जी’ म्हणणं भोवणार, राहुल गांधींविरोधात भाजपाकडून तक्रार दाखल

दहशतवादी मसुद अझहरचा उल्लेख जी असा करणं राहुल गांधींना चांगलाच भोवणार आहे. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर टीका करताना मसुद अझहरचा उल्लेख राहुल गांधी यांनी मसुद अझहरजी असा केला होता. या प्रकरणी आता भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. आकाश विजयवर्गीय हे कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आहेत.

काय आहे प्रकरण?
भाषण करत असताना राहुल गांधी हे अजित डोवाल यांच्यावर टीका करत होते. अजित डोवाल हे आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत मग ते विमानात बसून मसुद अझरजींना सोडवण्यास कसे गेले होते? असं म्हणत राहुल गांधी यांनी मसुद अझरचा उल्लेख जी असा आदरार्थी केला.

अजित डोवाल यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी ताळतंत्र सोडल्याची टीका भाजपा नेत्यांकडून होते आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही राहुल गांधी आणि पाकिस्तान या दोघांमध्ये एक साम्य आहे असे म्हटले आहे. ते साम्य म्हणजे दहशतवाद्यांबद्दल वाटणारे प्रेम आहे असे ट्विट स्मृती इराणी यांनी केले होते.

आता या पाठोपाठ राहुल गांधी यांच्याविरोधात आकाश विजयवर्गीय यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एखाद्या दहशतवाद्याला तुम्ही आदरार्थी संबोधन कसे देऊ शकता? असा प्रश्न विजयवर्गीय यांनी विचारला आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 3:03 pm

Web Title: bjp mla files police complaint against rahul gandhi for addressing jem chief as masood azharji
Next Stories
1 ‘दुसऱ्या देशात दहशतवादी हल्ले करणारे पाकिस्तानात मोकाट कसे?’, बिलावल भुट्टोंचा घरचा आहेर
2 सुजय विखेंविरोधात नगरमध्ये प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे-पाटील
3 काँग्रेसच्या काळात १५ वेळा सर्जिकल स्ट्राइक, अशोक गेहलोत यांचा दावा
Just Now!
X