CBSE Results 2020 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. http://cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकता. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावी आणि बारावीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार नाही. यंदा ८८.७८ टक्के सीबीएसई विद्यार्थांनी बारावीची परीक्षा पास केली आहे. त्रिवेंद्रम, बंगळुरू आणि चेन्नईनं यंदा चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली झोनमधील ९४.३९ टक्के विद्यार्थाी पास झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदापण मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात ९२.१५ टक्के मुली पास झाल्या आहेत.

लखनऊच्या दिव्यांशी जैन या विद्यार्थीनीनं सीबीएसई बारावीत ६०० पैकी ६०० गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. पैकीच्या पैकी गुण घेऊन दिव्यांशीनं ऐतिहासीक कामगिरी केली आहे. लखनऊमधील नवयुग रेडियंस स्कूलमध्ये दिव्यांशीनं शिक्षण घेतलं असून शाळेत आणि आजूबाजूच्या लोकांसाह नातेवाईकांनी दिव्यांशीला शुभेच्छा देत कौतुक केलं आहे.

मला पैकीच्या पैकी गुण मिळतील असा स्वप्नातही विचार केला नव्हता, अशी प्रतिक्रिया दिव्यांशीने निकालानंतर दिली आहे. दहावीमध्ये दिव्यांशाला ९७.६ टक्के गुण मिळाले होते. दिव्यांशाचे वडिल प्रकाश जैन व्यावसायीक असून आई सीमा जैन गृहिणी आहे.

CBSE बोर्डाच्या बारावीचा निकाल अधिकृत खालील संकेतस्थळावर पाहता येईल.

cbseresults.nic.in
cbse.nic.in
results.nic.in

असा पाहा निकाल –

> सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळावर जा…

> होमपेजवर CBSE बोर्ड रिजल्ट 2020 लिंक दिसेल त्यावर क्लीक करा.

> तुमचा बैठक क्रमांक टाकून संबधित माहिती भरा

> सबमिट बटन क्लीक केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.