07 March 2021

News Flash

प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने मरण्याचा अधिकार : सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी इच्छामरणाबाबत अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलं आहे

(संग्रहित छायाचित्र)

इच्छामरणाबाबत अत्यंत महत्त्वाचं भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी, ‘कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती आत्महत्या करु शकत नाही, मात्र प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे’ असं म्हटलं आहे.

‘एखाद्या व्यक्तीला दुर्धर आजाराने ग्रासलं असेल आणि त्याला इच्छा मरण हवं असेल तर तो ‘इच्छामरणाचे मृत्यूपत्र’ बनवू शकतो’, ‘अंतिम श्वास कधी घ्यायचा याचा प्रत्येकाला अधिकार आहे. फक्त संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसावा’, असं दीपक मिश्रा म्हणाले. पुण्यामध्ये ‘बॅलन्सिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल राइट्स’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

विशेष म्हणजे, याच वर्षी 9 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने एक ऐतिहासिक निर्णय देताना मराणासन्न व्यक्तीच्या इच्छामरणाच्या मृत्यूपत्राबाबत मार्गदर्शकतत्त्व घालून देत कायदेशीर मान्यता दिली होती आणि अखेरचा श्वास कधी घायचा याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला असेल अशी टीप्पणी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 11:18 am

Web Title: cji dipak misra said every one has the right to die with dignity in pune
Next Stories
1 तामिळनाडू : अटक केलेल्या योगेंद्र यादव यांची रात्री उशीरा सुटका
2 यशवंत सिन्हा यांनी निवडणूक लढवावी, केजरीवालांची विनंती
3 कोर्टात दाखवल्या तुरुंगातील चपात्या, मिळाली घरच्या जेवणाची परवानगी
Just Now!
X