News Flash

अनुदानित सिलिंडरसाठी आधार कार्डची गरज नाही – केंद्र सरकार

अनुदानित सिलिंडर खरेदी करण्यासाठी आधार कार्डची काहीही आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेमध्ये स्पष्ट केले.

| February 21, 2014 02:41 am

अनुदानित सिलिंडर खरेदी करण्यासाठी आधार कार्डची काहीही आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेमध्ये स्पष्ट केले. अनुदानित सिलिंडरचे वितरण आणि आधार कार्डशी जोडलेले खाते याचा संबंध तोडण्यासाठीचा आदेश आठवड्याभरात काढण्यात येईल, असेही सरकारने सांगितले.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी ही माहिती दिली. अनुदानित सिलिंडरवरील अंशदान थेट ग्राहकाच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने रद्द केला आहे. त्यामुळेच आता आधार कार्डशी जोडलेल्या खात्याशिवाय ग्राहक थेटपणे आपल्या एजन्सीकडून अनुदानित सिलिंडर खरेदी करू शकतात, असे मोईली यांनी सांगितले.
अंशदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याबद्दल बॅंकांच्या पातळीवर काही अडचणी होत्या. त्यामुळेच सरकारने ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला, असेही मोईली म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 2:41 am

Web Title: consumers can get lpg cylinders without aadhaar account govt
टॅग : Lpg
Next Stories
1 तेलंगणला राज्यसभेचाही होकार
2 ‘व्हॉटसअॅप’ही फेसबुकच्या बाहुपाशात!
3 राजीव हत्या :आरोपींच्या सुटकेवरून काँग्रेस-अण्णाद्रमुक सदस्यांची खडाजंगी
Just Now!
X