दिल्ली विद्यापीठाने रातोरात स्वातंत्र्यवीर सावरकर, भगत सिंग आणि सुभाषचंद्र बोस यांचे पुतळे हटवले आहेत. NSUI ने गुरुवारी रात्री उशिरा स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यानंतर शुक्रवारी रात्रीतून स्वातंत्र्यवीर सावरकर, भगत सिंग आणि सुभाषचंद्र बोस या तिघांचेही पुतळे हटवण्यात आले. दिल्ली विद्यापीठात NSUI आणि अभाविप यांच्याला संघर्ष वाढीला लागला आहे.

NSUI ने स्वातंत्र्यवीर सावरकर, भगत सिंग आणि सुभाषचंद्र बोस या तिघांचेही पुतळे रातोरात हटवले आहेत. त्यांच्या या कृतीला डाव्या पक्षांची विद्यार्थी संघटना असलेल्या AISA नेही पाठिंबा दिला आहे. दिल्ली विद्यापीठात शहीद भगत सिंग, सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतळे अभाविपने बसवले होते. हे पुतळे NSUI ने हटवले आहेत. अभाविपने भगत सिंग आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत सावरकरांचा पुतळा बसवून दोन देशभक्तांचा अपमान केला आहे असे एनएसयुआयने म्हटले आहे. सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यात काहीही योगदान नव्हते, ते देशभक्त नाही तर देशद्रोही होते असंही NSUI ने म्हटले आहे.

आता NSUI ने केलेल्या या कृतीमुळे अभाविप आक्रमक होणार हे निश्चित मानलं जातं आहे. सावरकरांच्या पुतळ्याला विरोध केल्याप्रकरणी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं. मौरिस नगर ठाण्यात या विद्यार्थ्यांना नेण्यात आलं. त्यानंतर समज देऊन सोडण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.