News Flash

आता ई-आधार कार्डवरही मिळणार सीमकार्ड

दुरसंचार विभागाने मोबाईल सीम विक्री करणाऱ्या कंपन्यांना दिले आदेश

दूरसंचार विभागाने ई-आधार कार्डला ओळख पत्र आणि रहिवासी पुरावा म्हणून गुरुवारी मान्यता दिली. त्यामुळे आता ई-आधारकार्डधारकांना नवीन मोबाईल सीमकार्ड खरेदी करणे सुलभ होणार आहे. दूरसंचार विभागाने मोबाईल सीम विक्री करणाऱ्या कंपन्यांना ई आधारकार्डवर सीमकार्ड देण्याचे आदेश जारी केले आहेत. बनावट कागदपत्रावर सीम खरेदी होत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाल्यानंतर मोबाईल कंपन्यांन्या सीमकार्डचे नवीन कनेक्शन देताना कागदपत्रांच्या पूर्ततेवर अधिक भर देताना दिसत आहेत. बनावट किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर करून सीमकार्डचा वापर टाळण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी कागद पत्राची पूर्तता काटेकोरपणे करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर मतदान ओळखपत्र किंवा पक्के आधार कार्ड छायांकित प्रती जमा करुन घेताना मूळ कागदपत्रांची देखील पडताळणी केली जाते. दरम्यान, मोबाईल कंपन्यांकडून सीमकार्ड खरेदी करताना मोबाईल ई-आधार कार्डवर सीमकार्ड दिले जात नव्हते. मात्र, दूरसंचार विभागाने दिलेल्या नव्या आदेशामुळे आधार कार्ड नोंदणी करुन देखील आधार कार्ड प्राप्त झाले नसेल किंवा आधार कार्ड हारवले असेल तर आधार कार्ड नोंदणी क्रमांकाच्या माध्यमातून ई-आधार कार्ड उपलब्ध करुन त्याच्या प्रिंटद्वारे सीमकार्ड खरेदी करणे शक्य होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:49 pm

Web Title: e aadhaar valid document for new mobile connections
Next Stories
1 Devyani Khobragde: देवयानी खोब्रागडे यांची रामदास आठवलेंच्या स्वीय सहाय्यकपदी नियुक्ती
2 Kashmir protests: छऱ्याच्या गोळ्यांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत झालेल्या जखमींना विमानाने दिल्लीत आणणार
3 Hafiz Saeed: … तर काश्मीर पाकिस्तानचा होईल, हाफिज सईदने ओकली गरळ
Just Now!
X