28 February 2020

News Flash

छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत पाच नक्षल्यांचा खात्मा

सुरक्षा दलाचे दोन जवानही जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

(संग्रहित छायाचित्र)

सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्या झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.  यानंतर या परिसरात मोठी शोध मोहिमही हाती घेण्यात आली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. सुरक्षा दलाचे दोन जवान या चकमकीत जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळच्या सुमारास छत्तीसगढ येथील नारायणपूर जिल्ह्यात असलेल्या अबुमझाड भागातल्या जंगलात ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच नक्षलींना ठार केलं. काही नक्षलवादी फरार झाले. त्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली.

सुरक्षा दलाचे जे जवान जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच ज्या भागात नक्षलींना ठार करण्यात आलं त्या भागात शोध मोहीम राबवण्यात येत असून हाय अलर्टही जारी करण्यात आला आहे.

 

First Published on August 24, 2019 12:25 pm

Web Title: five maoists have been killed in encounter with security forces in narayanpurchhattisgarh scj 81
Next Stories
1 आम्हाला चीनची गरज नाही: डोनाल्ड ट्रम्प
2 दिल्ली विद्यापीठातून रातोरात हटवण्यात आले सावरकर, भगत सिंग आणि बोस यांचे पुतळे
3 अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार: शिवसेना
Just Now!
X