News Flash

काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवाईत चार दहशतवादी ठार

सुरक्षा पथकांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा पथकांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले अशी माहिती पोलिसांनी दिली. चार ते पाच दिवसांपूर्वी हे दहशतवादी सीमापार करुन भारतीय हद्दीत घुसले होते. त्यांना शोधण्यासाठी सुरक्षा पथकांनी शोध मोहिम राबवली होती.

या शोध मोहिमेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी यंत्रणेने सुंदरबनी भागातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

या चकमकीत सुरक्षा पथकांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी एस.पी.वेद यांनी दिली. या कारवाईत भारतीय सुरक्षा दलाचा एकही जवान जखमी झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्वात आधी राजौरीचे जिल्हाधिकारी शाहीद चौधरी यांनी टि्वट करुन या चकमकीची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 5:53 pm

Web Title: four terrorist killed in encounter
टॅग : Kashmir,Terrorist
Next Stories
1 आणिबाणीनंतरच्या ‘जनता’ लाटेतही काँग्रेसला तारलं होतं कर्नाटकनं
2 FB बुलेटीन: स्मिथ, वॉर्नरवर एक वर्षाची बंदी; भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ मोर्चा आणि अन्य बातम्या
3 सीबीएसईची १० वी आणि १२ वीची परीक्षा पुन्हा होणार
Just Now!
X