पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने फेटाळला आहे. 24 मे रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. याआधी 29 मार्च रोजी लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला होता. मोदीला जामीन मिळू नये यासाठी या तपास यंत्रणांनी कोर्टात अत्यंत दमदारपणे आपली बाजू माडंली होती. कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर ईडी आणि सीबीआयच्या संयुक्त पथकातील अधिकाऱ्यांनी अंगठा वर करुन विजयी मुद्रा दाखवत तसेच एकमेकांशी हस्तांदोलन करीत आनंद व्यक्त केला, असे एएनआयच्या लंडनमधील प्रतिनिधींनी म्हटले होते.

आपले मामा मेहुल चोक्सी यांच्याशी संगनमत करून ४८ वर्षांचा नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेची २ अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तो लंडनमध्ये एका आलिशान वस्तीत राहात असल्याचे वृत्त ब्रिटनच्या ‘दि टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने दिले होते. भारताने प्रत्यार्पणासाठी केलेल्या विनंतीच्या आधारे नीरव मोदी याला नंतर अटक करण्यात येऊन, गेल्या वर्षी सीबीआयच्या विनंतीवरून त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.