आपल्या मुलावर खोटे आरोप करून त्याला बलात्काराच्या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आल्याचे रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी म्हटले आहे. सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक यांच्याविरोधात कन्नडमधील एका मॉडेलने बलात्कार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सदानंद गौडा यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात आपण कोणताही हस्तक्षेप करणार नाही. पोलीस त्यांचे काम करतील, असेही गौडा यांनी स्पष्ट केले.
कोडागू जिल्ह्यातील कुशालनगर येथे कार्तिक यांचा बुधवारी साखरपुडा झाला. त्यानंतर त्यांच्याविरोधात एका मॉडेलने बलात्काराची आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. कार्तिक यांच्याशी आपला विवाह झाल्याचा दावाही संबंधित मॉडेलने केला. याप्रकरणी आरटी नगर पोलीस ठाण्यात कार्तिक गौडा यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३७६ आणि ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे बेंगळुरूचे पोलीस आयुक्त एम. एन. रेड्डी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2014 रोजी प्रकाशित
आपल्या मुलाला बलात्काराच्या प्रकरणात गोवलंय – सदानंद गौडा
आपल्या मुलावर खोटे आरोप करून त्याला बलात्काराच्या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आल्याचे रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी म्हटले आहे.
First published on: 28-08-2014 at 12:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gowda says son falsely implicated in rape case