राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे. सचिन पायलट यांच्या गटाला उच्च न्यायालयानं २४ जुलैपर्यंत दिलासा देत सभापती सी.पी.जोशी यांना कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे.

माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या गटानं विधानसभेचे सभापती सी.पी.जोशी यांनी बजावलेल्या नोटिसीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या प्रकरणी न्यायालयात पहिल्यांदा सुनावणी झाली. त्यानंतर आजपर्यंत सर्वांनी न्यायालयासमोर आपलं मत मांजलं. राजस्थान उच्च न्यायालयात मंगळवारी यावरील सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला असून २४ जुलैपर्यंत या आमदारांविरोधात कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशही सभापतींना देण्यात आले आहेत.

आणखी वाचा- काँग्रेस हायकमांडकडून अशोक गेहलोत यांची कानउघडणी

“एकीकडे १९ आमदारांना उत्तर देण्यासाठी ३ दिवसांची मुदत देण्यात आली होती. तर दुसरीकडे बसपच्या आमदारांना कॉंग्रेसमध्ये आणण्याबाबत केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा युक्तीवाद मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात केला. दरम्यान, यावेळी मुकुल रोहतगी यांनी नोटिसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक मुद्द्यांवरही भाष्य केलं.

आणखी वाचा- “मी काय इथं भाजीपाला विकायला नाहीये, मी…”; पायलट यांच्यावर गेहलोत संतापले

यापूर्वी सरकार अल्पमतात आल्याचा दावा

काँग्रेसच्या १९ आमदारांच्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अल्पमतात आल्याचा दावा पायलट यांनी केला होता. पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना स्वगृही आणण्याचे काँग्रेसच्या नेतृत्वाचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर गेहलोत यांच्या समर्थक आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गेहलोत सरकार पाडण्याच्या कटात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा सहभाग असल्याचा आरोप करीत काँग्रेसनेते अजय माकन यांनी शेखावत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.

आणखी वाचा- सचिन पायलट यांनी सोडलं मौन; ‘त्या’ आमदाराविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करणार”

तो निकम्मा, नकारा – गहलोत

“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून तो निकम्मा, नकारा आहे, काही काम करत नाही हे आम्हाला ठाऊक होतं,” असं गेहलोत सचिन पायलट यांच्याबद्दल बोलताना म्हणाले. अशोक गेहलोत यांनी कुठेही सचिन पायलट यांचं नाव घेतलं नाही. अशोक गेहलोत यांनी केलेल्या टिकेवर सचिन पायलट यांनी काहीही प्रत्युत्तर दिलेलं नाही.