News Flash

आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मोदी सरकारची तयारी-अमित शाह

३ डिसेंबरला चर्चा करण्यासाठी येण्याचं आवाहन

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलकांना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक आवाहन केलं आहे. सरकार तुमच्या मागण्यांवर तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. ३ डिसेंबर रोजी कृषी मंत्र्यांशी चर्चा करा असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्याचा आणि तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. संसदेत कायदे मंजूर केल्यापासून शेतकरी राज्यांमध्येच आंदोलन करत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आलं असून, दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचं जाहीर करत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) हे कायदे पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेतले. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर कायदे लागूही करण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्राच्या या कायद्यांना देशातील काही भागातील शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. विशेषतः पंजाब हरयाणात या कायद्याविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे.

आधी पंजाब व हरयाणात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली होती. दोन दिवसांपूर्वी हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांचे जत्थे दिल्लीच्या सीमेवर दाखल झाले. मात्र, करोनाचा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी नाकारली. शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं असून, आज सरकारनं चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 9:00 pm

Web Title: i appeal to the protesting farmers that govt of india is ready to hold talks says amit shah scj 81
Next Stories
1 हैदराबादचं नाव भाग्यनगर करायला आलोय, योगी आदित्यनाथ यांची गर्जना
2 Coronavirus : या लढाईत शेजारी देशांसोबत अन्य देशांनाही सहकार्य करणं आपलं कर्तव्य – पंतप्रधान
3 मोदी सरकारने जवानांनाच शेतकऱ्यांच्या विरोधात उभं केलं-राहुल गांधी
Just Now!
X