02 March 2021

News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत-राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोदींविरोधात आक्रमक

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत, मी भाजपाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतो माझ्याशी फक्त दहा मिनिटे वाद घालून दाखवा. मला खात्री आहे डरपोक पंतप्रधान नरेंद्र मोदी पळून जातील. दिल्लीत झालेल्या अल्पसंख्याक परिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसेच त्यांना डरपोक म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची वाट लावली असाही आरोप त्यांनी यावेळी केली.

पहा व्हिडिओ

राहुल गांधी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. हे दोघे स्वतःला देशाच्या वरचढ समजतात मात्र, देश यांच्यापेक्षा वरचढ आहे आणि येत्या तीन महिन्यात याचा प्रत्यय या दोघांनाही येणार आहे असाही टोला राहुल गांधींनी लगावला. मोदीना माझ्यासमोर आणलं तर ते १० मिनिटंही चर्चा करू शकणार नाहीत स्टेजवरून काढता पाय घेतील असाही खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावला.

दरम्यान काँग्रेसच्या या परिषदेत सत्तेत आल्यास तिहेरी तलाक रद्द करू असेही आश्वासन काँग्रेसतर्फे देण्यात आले. काँग्रेस नेत्या सुष्मिता देव यांनी त्यांच्या भाषणात हे आश्वासन दिले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणात मोदी सरकारवर निशाणा साधला. सत्ता जरी भाजपाची आणि मोदी पंतप्रधान असले तरीही या सत्तेचा रिमोट कंट्रोल संघाकडे आहे अशीही टीका राहुल गांधी यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 4:45 pm

Web Title: i challenge the bjp let narendra modi ji debate with me for 10 minutes says rahul gandhi
Next Stories
1 सोनिया गांधींकडून नितीन गडकरींचं कौतुक
2 सीबीआयला हादरा, नागेश्वर राव हाजीर हो; सुप्रीम कोर्टाचे आदेश
3 भाजपाच्या तिकीटावर विरेंद्र सेहवाग लढणार लोकसभा निवडणूक ?
Just Now!
X