22 September 2020

News Flash

जम्मूच्या अखनूरमध्ये एक आणि कुपवाड्यात दोन दहशतवाद्याचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त

अखनूर आणि कुपवाडा या दोन्ही ठिकाणी शोध मोहीम सुरु आहे अशीही माहिती समोर आली आहे

सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये आज दुपारी १ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्याकडून सुरक्षा दलांनी मोठा शस्त्रसाठाही जप्त केला आहे. ज्यामध्ये पिस्तुल, हँड ग्रेनेड आणि काडतुसांचा समावेश आहे. सुरक्षा दलांकडून शोध मोहीम अजूनही सुरु आहे. सुरक्षा दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती एएनआयला दिली आहे.

याआधी १० तारखेलाही पुलवामा या ठिकाणी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्यावेळीही मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. आज पुन्हा एकदा एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. शोध मोहीम सुरु आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अखनूरप्रमाणेच काही वेळापूर्वी कुपवाडा येथेही दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तिथेही शोध मोहीम सुरु आहे. अशीही माहिती मिळते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 6:41 pm

Web Title: in an encounter between security forces terrorists in akhnoor sector pakistani terrorist eliminated at around 0150 pm today
Next Stories
1 बापरे! महिलेच्या पोटात आढळल्या दीड किलो यू पिन, हेअर पिन आणि साखळ्या
2 शबरीमाला प्रवेश वाद: २२ जानेवारीला सर्व फेरविचार याचिकांवर सुनावणी
3 धक्कादायक! दरवर्षी भारतातील मंदिरांतून होते १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी
Just Now!
X