News Flash

INX Media Case : जामीन मिळूनही चिदंबरम यांना राहावं लागणार कोठडीत!

सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात दिलासा

आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, तरीही चिदंबरम यांना २४ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेल्या गु्न्ह्यात जामीन दिला असून, चिदंबरम सध्या ईडीच्या कोठडीत आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. “पी. चिदंबरम यांना इतर कोणत्याही प्रकरणात अटक झालेली नसेल तर त्यांना जामीन दिला जाऊ शकतो. मात्र, त्यासाठी त्यांना १ लाख रूपयांचा बॉण्डपेपर आणि चौकशीला बोलवण्यात आल्यानंतर हजर राहावं लागेल,” असं न्यायालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, चिदंबरम यांना ईडीने तिहार तुरूंगातून ताब्यात घेतलं होतं. सध्या ते ईडीच्या कोठडीत असून, २४ ऑक्टोबरला कोठडीची मुदत संपणार आहे. त्यानंतर त्यांची कोठडी वाढवली जाते की, जामीन दिला जातो याचा निर्णय होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 10:52 am

Web Title: inx media case chidambaram gets bail in cbi case to remain in ed custody bmh 90
Next Stories
1 एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू होणार; पुढील महिन्यात निविदा मागवणार?
2 अपहरणकर्ते ट्रॅफिकमध्ये अडकले; सातव्या मिनिटाला पोलिसांच्या लागले हाती
3 शिवसेनेतर्फे १० रुपयांत थाळी, ‘साहेब खाना’ योजना सुरू
Just Now!
X