भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने रिसॅट मालिकेतील RISAT-2BR1 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपग्रह खूप महत्वाचा आहे. या उपग्रहाला स्पाय सॅटलाइट म्हटले जाते. हा एक बहुउपयोगी उपग्रह असून त्याचे वेगवेगळे फायदे आहेत.

– रिसॅट-२ बीआर१ उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित झाल्यानंतर भारताची रडार इमेजिंग म्हणजे शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची क्षमता कैकपटीने वाढणार आहे.

– या उपग्रहाचे काम सुरु झाल्यानंतर लगेचच आपल्याला आवश्यक फोटो मिळण्यास सुरुवात होईल.

– या उपग्रहामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होईल. सैन्यदलांना रणनिती ठरवण्यात या उपग्रहाची मदत होईल.

– शत्रुच्या हालचाली या उपग्रहाच्या नजरेतून सुटण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.

– कुठल्याही वातावरणात ढगांच्या आडूनही फोटो काढण्यास RISAT-2BR1 सक्षम आहे.

– त्याशिवाय शेती, जंगल आणि आपत्तीच्या काळातही या उपग्रहाची मदत मिळणार आहे.

– मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर भारताने रिसॅट २ उपग्रह प्रक्षेपित केला होता.

– पाकिस्तानातून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी, सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे तळ याची खडानखडा माहिती मिळू शकेल.

– बालाकोट सारख्या मिशनची आखणी करण्यामध्ये भविष्यात रिसॅट-२बीआर१ खूप महत्वाचा ठरेल.