25 September 2020

News Flash

मंगळयानाचा ग्रहण काळ कमी करण्याचे पुढील वर्षी प्रयत्न

‘इस्रो’ अध्यक्षांची माहिती; मोहिमेला दोन वर्षे पूर्ण

| September 26, 2016 01:55 am

‘इस्रो’ अध्यक्षांची माहिती; मोहिमेला दोन वर्षे पूर्ण

मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम) या भारताच्या मंगळ मोहिमेला काल दोन वर्षे पूर्ण झाली असून अपेक्षेपेक्षा यानाने अधिक काळ काम दिले आहे. आता पुढील वर्षी या अवकाशयानाचा अंधारात असण्याचा काळ म्हणजे ग्रहण काळ कमी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले, की मॉम मोहिमेला दोन वर्षे पूर्ण झाली असून त्याचा अपेक्षित कार्यकाल सहा महिने होता. त्यानंतर वर्षभर त्याच्या पाच पेलोडमधून मिळालेली माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने प्रसारित केली. ग्रहण काळात त्याला बॅटरीचा आधार घ्यावा लागतो. जर ग्रहण काळ कमी केला तर ती बॅटरी जास्त काळ टिकू शकेल. ग्रहण काळाचा परिणाम अवकाशयानाच्या कार्यक्षमतेवर कमी व्हावा यासाठी हा प्रयत्न केला जाणार असून अजूनही यानात बऱ्यापैकी इंधन आहे. त्यामुळे ते इतके दिवस कार्यरत राहू शकले.

मॉम म्हणजे मंगळयान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने सोडले होते. त्यासाठी पीएसएलव्ही सी २५ हा प्रक्षेपकही वापरण्यात आला होता. खोल अंतराळातील ३०० दिवसांच्या प्रवासानंतर हे यान २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आले होते. मंगळयानाने पहिल्या दोन वर्षांत मिळवलेली माहिती जाहीर करण्यात आली असून भारताच्या या मोहिमेला अमेरिकेच्या अवकाश संस्थेचा स्पेस पायोनियर पुरस्कार तसेच नि:शस्त्रीकरण व विकासासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळाला होता. यानाने मंगळाच्या उत्तर ध्रुवावरील संप्लवन प्रक्रियेवर प्रकाश टाकला असून तेथील कार्बन डायॉक्साइड व पाण्याचे बर्फ यांचे थर उन्हाळ्यात नष्ट होत असतात. त्याबाबतच्या माहितीत मॉमच्या निरीक्षणांनी भर पडली आहे.

 

परग्रहवासियांशी संपर्क करू नये! ; स्टीफन हॉकिंग यांचा इशारा

लंडन : प्रसिद्ध ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मानवाने एलियनशी संपर्क करू  नये, असे इशारा देताना म्हटले आहे. मानवापेक्षा जे तांत्रिकदृष्टय़ा अधिक प्रगत आहेत, त्यांच्याशी संपर्क न करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आपल्यापेक्षा कोणत्याही प्रगत संस्कृतीशी आपण संपर्क केल्यास काही तरी वेगळी स्थिती निर्माण होऊ शकते. जेव्हा मूळ अमेरिकन लोकांनी क्रिस्टोफर कोलंबस याला पाहिले तेव्हा ज्या प्रकारची स्थिती झाली होती, तशीच स्थिती प्रगत संस्कृतीशी संपर्क केल्यास होऊ शकते. ते त्या वेळी खूप चांगले झाले नाही, असे हॉकिंग यांनी नवीन ऑनलाइन व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 1:55 am

Web Title: isro to perform key manoeuvre on mars orbiter next year
Next Stories
1 सुषमा स्वराज पाकला सडेतोड उत्तर देणार!
2 उरी हल्ल्यात हात नसल्याचे पाकचे वक्तव्य अविश्वासार्ह
3 आंध्र, तेलंगण अल्पसंख्याक आयोगाचा तोंडी तलाक पद्धतीला विरोध
Just Now!
X