19 September 2020

News Flash

आझम खान यांनी माझ्यावर अॅसिड हल्ल्याचा प्रयत्न केला, अभिनेत्री जयाप्रदांचा आरोप

आझम खान यांच्यावर जयाप्रदांनी गंभीर आरोप केले आहेत

संग्रहित छायाचित्र

आझम खान यांनी माझ्यावर अॅसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा खळबळजनक आरोप अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी नेत्या जयाप्रदा यांनी केला आहे. शुक्रवारीच अमरसिंग यांच्याबाबत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. मी अमरसिंग यांना राखी बांधली तरीही लोक आम्हाला नावं ठेवतील असं त्या म्हटल्या होत्या. मात्र आता त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आझम खान यांनी मला तुझ्यावर अॅसिड हल्ला करेन अशा धमक्या दिल्या होत्या, तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. मी त्यावेळी माझ्या आईलाही ही गोष्ट सांगू शकले नाही इतकी मी घाबरले होते असेही जयाप्रदा यांनी म्हटले आहे.

मी त्यावेळी आवाज उठवला असता तर माझ्या बाजूने बोलण्यासाठी एकही राजकीय नेता पुढे आला नसता. आजही माझ्या बाजूने बोलण्यास कोणीही पुढे येणार नाही असेही जयाप्रदा यांनी म्हटले आहे. #MeToo या मोहिमेचं जयाप्रदा यांनी कौतुक केलं आहे. तसेच या मोहिमेअंतर्गत त्यांनी आता आझम खान यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एक महिला राजकारणात आली आहे हे बहुदा आझम खान यांना बघवले नसावे म्हणून त्यांनी मला अॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली असेही जयाप्रदा यांनी म्हटले आहे.

ज्यावेळी मी अडचणीत होते तेव्हा मुलायम सिंग यांनी मला एक साधा फोनही केला नाही एकाही नेत्याने मला पाठिंबा दिला नाही. त्यावेळी मी इतक्या नैराश्याने ग्रासले होते की माझ्या मनात आत्महत्येचाही विचार केला होता. माझे काही मॉर्फ फोटो व्हायरल करण्यात आले होते तेव्हाही मला वाटले होती की जीव द्यावा. फक्त अमर सिंग यांनीच मला पाठिंबा दिला. त्यामुळे मी त्यांचा आदर करते. त्यांना मी राखी बांधली तरीही लोक आमच्याबद्दल वाईटच बोलतील याचीही मला खात्री आहे असंही जयाप्रदा यांनी म्हटले आहे. मागील वर्षी पद्मावत हा सिनेमा आला होता त्यावेळीही जयाप्रदा यांनी आझम खान यांच्यावर टीका केली होती. पद्मावत सिनेमातील अल्लाउद्दीन खिल्जी पाहून मला आझम खान आठवले असं जयाप्रदा यांनी म्हटले होते. आता तर मीटू या मोहिमेतंर्गत जयाप्रदा यांनी आझम खान यांच्यावर आरोप केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 11:46 am

Web Title: jaya prada also made serious allegations against senior samajwadi party sp leader and rampur mla azam khan including a claim that he attempted an acid attack on her
Next Stories
1 मला कुवतीपेक्षा जास्त मिळालंय, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही: नितीन गडकरी
2 आझम खानवर गुन्हा दाखल, RSSला बदनाम केल्याचा आरोप
3 खाद्यपदार्थाच्या पाकिटावर ‘आटा- मैदा’ उल्लेख बंधनकारक
Just Now!
X