News Flash

महत्वाची बातमी : JEE Advanced – 2021 परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली माहिती

महत्वाची बातमी :  JEE Advanced – 2021 परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार
(संग्रहीत)

आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा साखळीतील ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करून ही परीक्षा घेतली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

केंद्रीय संस्थांतील प्रवेश जेईईच्या गुणांनुसार होतात. जेईई मुख्य परीक्षा आणि जेईई अ‍ॅडव्हान्स अशा दोन परीक्षा घेण्यात येतात. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलल्यानंतर, जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती.

…तर जेईई विद्यार्थ्यांना पुन्हा संधी -धर्मेंद्र प्रधान

दरम्यान राज्यातील पूरग्रस्त सात जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना २७ जुलैपर्यंत होणाऱ्या जेईई (मुख्य) तिसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर जाता आले नाही, तर त्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतलेला आहे.

कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीमुळे या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2021 9:30 pm

Web Title: jee advanced 2021 examination will be held on the 3rd october 2021 msr 87
Next Stories
1 कारगिल युद्धात इस्रायलने कशी केली होती भारताला मदत?; ट्विट करत दिली माहिती
2 ट्रॅक्टरद्वारे गाझीपूर बॉर्डरवर जाणार आणि १५ ऑगस्टला झेंडा फडकवणार – राकेश टिकैत
3 ‘स्विस बँकेत देशातून किती काळा पैसा गेला?’; संसदेत सरकारने दिलं उत्तर
Just Now!
X