10 August 2020

News Flash

कुपवाडात दहशतवादी चकमक; दोन अतिरेक्यांना कंठस्नान

हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत, याची ओळख अद्यापही पटलेली नाही.

gun battle in Kupwara : शोध मोहिम सुरू असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला.

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गुरूवारी सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. लोलाब परिसरात चार दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली. शोध मोहिम सुरू असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. मात्र, हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत, याची ओळख अद्यापही पटलेली नाही. ही कारवाई अद्यापही सुरु असून अन्य दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2016 10:04 am

Web Title: jk two unidentified militants killed in gun battle in kupwara
Next Stories
1 पनामा पेपर्स: टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे अमिताभ संचालक मंडळाच्या बैठकीत सहभागी झाल्याचे पुरावे
2 साखर दराची चाळिशी पार
3 मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन२१ कि.मी सागरी बोगद्यातून
Just Now!
X