जिलेटीनच्या कांडयांनी भरलेल्या ट्रकच्या स्फोटात आठ खाण कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. कर्नाटकाच्या शिवमोगा जिल्ह्यातील उनासोंडी येथील दगड खाणीत गुरुवारी रात्री ही दुर्देवी घटना घडली. रात्री अंधाराची वेळ असल्याने नेमका किती जणांचा मृत्यू झाला, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
At least eight people have died in a dynamite blast at a railway crusher site in Hunasodu village: Shivamogga District Collector KB Shivakumar#Karnataka https://t.co/9JZ3qweHjK
— ANI (@ANI) January 21, 2021
दुर्घटना घडली त्या खाणीत पोलिसांना अजून जाता आलेले नाही. घटनास्थळावरुन जी माहिती मिळतेय, त्यानुसार ट्रकमध्ये जिलेटीनच्या कांड्या किंवा खाणीत दगड फोडण्यासाठी लागणारे साहित्य भरलेले होते. दुर्घटनेच्यावेळी ट्रक एका जागी उभा होता व मजूर विश्रांती घेत होते. दगड खाणीमध्ये झालेला हा स्फोट इतका शक्तीशाली होता की, ३० किलोमीटरच्या परिसरातील अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या व इमारतींचे नुकसान झाले.
Pained by the loss of lives in Shivamogga. Condolences to the bereaved families. Praying that the injured recover soon. The State Government is providing all possible assistance to the affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 22, 2021
शिवमोगामधील या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे स्फोटाची झळ बसलेल्या सर्वांना राज्य सरकार सर्व आवश्यक सहकार्य करत आहे असे पंतप्रधान मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.