निवडणूक आयोगाचा मोदींना सल्ला
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी आपल्या सभेत काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा खुनी पंजा असा उल्लेख केल्याबद्दल निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगाने याबाबत मागितेले स्पष्टीकरण नरेंद्र मोदींनी आज आयोगासमोर सादर केले. आयोगाने मोदींच्या स्पष्टीकरणावर नाराजी व्यक्त केली आणि यापुढे भाषा जरा जपून वारण्याचा सल्ला दिला. तसेच राजकारणात अशा शब्दांच्या वापरामुळे पक्षाचा अवमान होत असल्याचेही आयोगाने नमूद केले.
‘आयएसआय’कडून दाऊदला नरेंद्र मोदींच्या हत्येची सुपारी!
मोदींनी छत्तीसगडमधील प्रचार सभेत काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाला लक्ष्य करत ‘खुनी पंजा’ असल्याचे म्हटले होते. त्यानंतर यावर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.    
यावर खुलासा देताना मोदींनी नऊ पानी उत्तर निवडणूक आयोगाला दिले होते. यात त्यांनी भाषण स्वातंत्र्य अधिकाराचा आधार घेत राजकारणावर आणि काँग्रेसच्या ढेपाळलेल्या प्रशासनावर टीका केल्याचे म्हटले. यातून कोणत्याही प्रकारे जनतेच्या भावना भडकविल्या गेलेल्या नाहीत असेही मोदींनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
काँग्रेस वाळवीसारखी: मोदींची टीका