लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर बिहारमध्ये एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे एकत्र येताना दिसत आहेत.
बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी शुक्रवारी होणाऱया विश्वासदर्शक ठरावावेळी लालूप्रसादांनी संयुक्त जनता दलाच्या(जेडीयू) नव्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणूकीतील झालेल्या मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्विकारत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जदयूच्या बैठकीत जितन राम मांझी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्याचे ठरविण्यात आले. यावर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने(राजद) या नव्या बिहार सरकारला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.