भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी चार दहशतवादी भारतात दाखल झाल्याचे वृत्त होते. मात्र, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी दिल्ली पोलीस, गुप्तचर विभाग आणि जम्मू काश्मीर पोलीसांनी एक संयुक्त अभियान राबिवले होते. या अभियानात दोन दोघांना अटक करण्यात आली असून दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आला आहे.
गुप्तर विभागाच्या माहितीनुसार, हे दहशतवादी लष्करचा कमांडर अबू दुजानाच्या संपर्कात होते. दहशताद्यांमधील रेकॉर्ड करण्यात आलेल्या संभाषणात ‘व्हिआयपी’ या शब्दाचा उच्चार अनेकवेळा करण्यात आलेला. त्यानुसार भारतातील महत्त्वाच्या व्यक्ती या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होत्या असे कळले होते. मोदी ज्यावेळी गर्दीच्या ठिकाणी प्रवेश करतील त्यावेळी २६/११ अथवा पॅरिस सारखा हल्ला किंवा आत्मघाती हल्ला दहशतवादी करणार असल्याचा अंदाज गुप्तचर विभागाने व्यक्त केलेला.