News Flash

‘काश्मीरमध्ये स्थानिक नेत्यांकडून स्वार्थापोटी भीतीदायक वातावरण निर्मिती’

भाजपा सरचिटणीस राम माधव यांचा आरोप

संग्रहीत छायाचित्र

भाजपीचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी बुधवारी श्रीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील स्थानिक राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी या ठिकाणी भीतीचे वातावरण तयार करत असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून उचलली जाणारे पावलं येथील परिस्थितीनुसार आहेत. जम्मू-काश्मीर विशेषतः काश्मीरमध्ये सैन्य तैनात करणे अथवा कमी करणे ही नेहमीची प्रक्रिया असल्याचेही ते म्हणाले.

राम माधव यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रेदरम्यान या ठिकाणी अतिरिक्त सैन्य तैनात केले जाते. त्यामुळे जास्तीचे सैन्य तैनात करण्याच्या निर्णयाकडे वेगळ्या अर्थाने पाहण्यात केवळ येथील स्थानिक नेत्यांचा स्वार्थ दडलेला आहे. आता भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणे सुरू असल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी हे राजकीय नेते नाटक करत असल्याचेही माधव म्हणाले.

महबूबा मुफ्तीवर निशाणा साधत माधव म्हणाले की, स्वतःला राजकीयदृष्ट्या टिकवण्यासाठी त्यांच्याकडून अशाप्रकारची वक्तव्य केली जात आहेत. आपला जनाधार वाचवण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. तर, आम्हाला जम्मू-काश्मीरमध्ये पुढे जाण्यासाठी काम करायचे आहे, शिवाय विधानसभा निवडणुका देखील होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काल संसदेत ज्याप्रकारे काहीजणांनी अनुपस्थित राहून तिहेरी तलाक विधेयकास समर्थन दिले, आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. अशाचप्रकारे पंतप्रधान मोदींच्या चांगल्या कामांचे समर्थन करा, उघडपणे करू शकत नसाल तर गैरहजर राहून करा असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 6:55 pm

Web Title: local political leaders are creating an environment of fear msr 87
Next Stories
1 परराष्ट्र मंत्रालयाचे पाकिस्तानी उच्चायुक्तांना खरमरीत पत्र
2 सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढवणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
3 राज ठाकरेंनी घेतली ममता बॅनर्जींची भेट
Just Now!
X