मध्य प्रदेशमधील राजपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार देवीसिंह पटेल यांचे निधन झाले आहे. पटेल यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. निवासस्थानी असताना अचानक त्यांना छातीत वेदना जाणवू लागल्या होत्या, असे सांगण्यात येते.

या घटनेनंतर पक्षातही शोककळा पसरली आहे. देवीसिंह पटेल यांनी राजपूरचे चारवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्याचबरोबर ते एकदा राज्यमंत्री ही होते. यावेळी ते पुन्हा एकदा राजपूर मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभारले होते.

देवीसिंह पटेल १९८४ ते २०१३ दरम्यान ७ वेळा निवडणूक लढवली आणि त्यांनी ४ वेळा विजय मिळवला. १९८९ मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पहिल्यांदा पराभव करुन विधानसभेत प्रवेश केला होता. राजपूर मतदारसंघातून यावेळी त्यांची लढत काँगेसचे उमेदवार बाला बच्चन उभे आहेत.