दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार महेश बाबूची सावत्र आई विजया निर्मला यांचं बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. विजया निर्मला या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या दिग्दर्शिका होत्या. हैदराबादमधील गाचीबोउली शहरातील एका रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

निर्मला यांचा जन्म २० जानेवारी १९४६ रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. त्यांच्या करिअरच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ४४ तेलुगू चित्रपटांची निर्मिती केली होती. विशेष म्हणजे सर्वाधिक चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या त्या पहिला महिल्या ठरल्या होत्या. त्यामुळेच २००२ साली त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ रिकॉर्डसमध्येही नोंदविण्यात आलं होतं.  १९५० साली त्यांनी बालकलाकार म्हणूनही चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

दरम्यान, २००८ साली त्यांना रघुपीठ वेंकैय्या या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. त्यासोबतच त्यांनी मल्याळम, तेलुगू आणि तामिळ अशा जवळपास २०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या पश्चात पति कृष्णा आणि मुलगा नरेश आहेत.