डेटींग पोर्टलवरुन ओळख झालेल्या महिलेला हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करणे एका तरुण इंजिनिअरला चांगलेच महाग पडले आहे. सदर महिला आता पैशांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप इंजिनिअरने केला आहे. काडूगोडी येथे राहणाऱ्या या इंजिनिअरच्या तक्रारीवरुन पोलीस आता महिलेचा शोध घेत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

प्रिया सिंह अशी या महिलेने स्वत:ची ओळख करुन दिली होती. आपण राजस्थानचे आहोत असे त्या महिलेने इंजिनिअरला सांगितले होते. दुसऱ्या मुलाच्या प्रसूतीसाठी पत्नी तिच्या माहेरी गेलेली असताना डेटींग पोर्टलवरुन संबंधित महिलेशी संपर्क साधला असे या इंजिनिअरने पोलिसांना सांगितले. आपण महिला मैत्रिणीच्या शोधात असल्याचे इंजिनिअरने सांगितल्यानंतर लगेचच प्रियाने त्याला पिंग केले. काही तासात दोघे मनाने परस्परांच्या खूपच जवळ आले.

प्रियाने आपण राजस्थानचे असल्याचे सांगितले. तिने सेक्स टॉकसाठी सहमती दर्शवली अशी इंजिनिअरने पोलिसांना माहिती दिली. दोघांचे व्हॉट्सअॅपवरुन परस्परांना मेसेजेस सुरु झाल्यानंतर प्रियाने व्हिडीओ कॉलवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली. २८ ऑक्टोंबरला रात्री प्रियाने मला व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉल केला. मी माझे कपडे उतरवले तर ती सुद्धा तसेच करेल असे तिने सांगितले.

मी तिच्यावर विश्वास ठेऊन न्यूड झालो. पण प्रिया समोरुन हसत होती व तिने कॉल डिसकनेक्ट केला असे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. प्रियाने तीन व्हिडीओ कॉल केले व सर्व रेकॉर्ड केले. त्यानंतर प्रियाने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. मी पैसे दिले नाहीत तर व्हिडीओ सोशल मीडियावर अपलो़ड करण्याची तिने धमकी दिली. मी एक नोव्हेंबरला पेटीएमने ३० हजार ट्रान्सफर केले. त्यानंतर तिने पुन्हा १५ हजार मागितले तेव्हा मी पोलिसात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला अशी तक्रारदार इंजिनिअरने पोलिसांना माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या महिलेचा फोन बंद आहे. तिने जे स्वत:चे नाव सांगितले ते खोटे असू शकते. तिला शोधून काढण्यासाठी आम्ही सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पोलिसांची मदत घेत आहोत असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.