News Flash

काँग्रेसच्या मंत्र्याला वाचता येईना, जिल्हाधिकाऱ्यांना दिला भाषण वाचण्याचा आदेश

प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी पोहोचलेल्या काँग्रेस मंत्र्याला साधं आपलं भाषणही वाचता आलं नाही

मध्य प्रदेशात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी पोहोचलेल्या काँग्रेस मंत्र्याला साधं आपलं भाषणही वाचता आलं नाही. भाषण वाचता न आल्याने मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या मंत्री इमरती देवी यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच भाषण वाचण्याचा आदेश दिला. इमरती देवी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या जिल्हाधिकारी पुढे वाचतील असं सांगताना दिसत आहेत.

व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे इमरती देवी भाषण देण्यासाठी उभ्या राहतात. मात्र वाचताना अडखळू लागल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी भारत यादव यांना पुढील भाषण वाचण्याचा आदेश दिला आणि बाजूला झाल्या.

जेव्हा त्यांना याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आपण गेल्या दोन दिवसांपासून आजारी असल्याचं कारण दिलं. ‘आपण गेल्या दोन दिवसांपासून आजारी आहोत. तुम्ही डॉक्टरला विचारु शकता. पण चिंता करण्याचं कारण नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व भाषण व्यवस्थित वाचलं आहे’, असं इमरती देवी यांनी सांगितलं. इरमती देवी यांनी काँग्रेसच्या तिकीटावर ग्वालियरमधून निवडणूक लढवत जिंकली होती. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांना मंत्रीपद दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 6:23 pm

Web Title: mp minister imarti devi unable to read republic day speech
Next Stories
1 ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणातील आरोपी गौतम खेतान यांना अटक
2 Republic Day 2019 : सुभाषचंद्र बोस यांच्या नव्वदीपार चार जवानांनी घेतला संचलनात भाग
3 ‘कमलनाथजी मी सगळ्या मंत्र्यांची बाप आहे’
Just Now!
X