08 March 2021

News Flash

‘नॅशनल कॉन्फरन्सचे मोदी किंवा भाजपशी कोणतेही संबंध नाहीत’

नॅशनल कॉन्फरन्सचे भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचा खुलासा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी केला.

| November 5, 2013 05:09 am

नॅशनल कॉन्फरन्सचे भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचा खुलासा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी केला. 
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, प्रचार सभांमधून त्यांचा प्रभाव दिसून येतो. याचा फायदा भाजपला होईल, असे भाकीत वर्तवत अब्दुल्ला यांनी सोमवारी मोदींची स्तुती केली होती. त्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी खुलासा करून आपले मोदी यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले, नॅशनल कॉन्फरन्सचे मोदींबरोबर किंवा भाजपबरोबर कोणतेही संबंध नाहीत. हवे असल्यास मी तसे लिहून द्यायला तयार आहे. वेळ आल्यास आम्ही सत्तेपासून लांब राहू. मात्र, (यूपीए) आघाडीतील पक्षांची साथ सोडणार नाही आणि त्यांची फसवणूक करणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2013 5:09 am

Web Title: nc will have no relations with nda bjp or modi omar
टॅग : Omar Abdullah
Next Stories
1 राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन
2 मंगळयानाला शुभेच्छा
3 …आता भारतातही मंगलमय बदल होतील – मोदी
Just Now!
X