काठमांडू : नेपाळमध्ये पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या फुटीर गटाने रविवारी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षाच्या सर्वसाधारण सदस्यपदावरून हकालपट्टी केली असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. यापूर्वी या गटाने ओली यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवले होते.
ओली यांच्या अलीकडच्या कृतींबाबत पक्षनेतृत्वाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. मात्र त्यांनी स्पष्टीकरण न दिल्यामुळे माजी पंतप्रधान प्रचंड व माधवकुमार नेपाळ यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या स्थायी समितीच्या बैठकीत ओली यांना सर्वसाधारण सदस्य म्हणून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे ‘दि हिमालयन टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे. प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील गटाने पंतप्रधानांच्या बालुवाटार येथील निवासस्थानी हकालपट्टीचे पत्र नेऊन दिले. ओली हे पक्षाचे नियम मोडीत असल्याचा आरोप आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 25, 2021 12:54 am