12 July 2020

News Flash

…असं वाटतंय की मी एखादं स्वप्नं पाहतोय; नितीश यांना भेटल्यावर मोदींची प्रतिक्रिया

मोदी खूपच भावूक झाले होते.

Bihar Chief Minister and JD(U) National President Nitish Kumar : ही चर्चा संपल्यानंतर नितीश यांनी बंगल्यातील आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, भाजपचे लोक येतायत, ते जेवणार पण आहेत. त्यानंतर साधारण ६० लोकांचे जेवण बनवण्यात आले.

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. नितीश यांनी इतक्या अचानकपणे निर्णय घेतल्यामुळे मोठा धक्का बसला होता. मात्र, आता या संपूर्ण घटनाक्रमातील एक एक पैलू पुढे येण्यास सुरूवात झाली आहे. नितीश कुमार बुधवारी राजीनामा देऊन त्यांच्या निवासस्थानी परतले तेव्हा या ठिकाणी जदयूचे अनेक आमदार जमले होते. त्यांच्याशी संवाद साधून नितीश कुमार घरात आले. तेव्हा टीव्हीवर लालू प्रसाद यादव यांची पत्रकार परिषद सुरू होती. तर दुसरीकडे काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नितीश यांच्या निर्णयाचे कौतुक केले होते. नितीश यांनीही मोदींच्या या ट्विटला उत्तर दिले. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नितीश यांना फोन केला. त्यानंतर साधारण अर्धा तासानंतर सुशील मोदी यांनी नितीश यांना फोन केला. या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती. ही चर्चा संपल्यानंतर नितीश यांनी बंगल्यातील आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, भाजपचे लोक येतायत, ते जेवणार पण आहेत. त्यानंतर साधारण ६० लोकांचे जेवण बनवण्यात आले. या मेजवानीसाठी पुरी, बटाट्याची भाजी, पनीरची भाजी असा बेत आखण्यात आला होता. बंगल्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी अनेक खुर्च्याही लावण्यात आल्या.

ही सगळी तयारी होईपर्यंत सुशील मोदी, नंद किशोर यादव, प्रेम कुमार नित्यानंद राय, जीतन मांझी यांच्यासह भाजपचे जवळपास सर्व बडे नेते नितीश यांच्या निवासस्थानी पोहचले होते. सुशील मोदी यांनी लगेचच आपण सरकारमध्ये सामील होत असल्याचे सांगितले. त्यानंतर या सर्व नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा सुरू होती. अखेर सर्व गोष्टींवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर सुशील मोदी खूपच भावूक झाले होते. त्यांनी म्हटले की, असं वाटतंय की मी एखादं स्वप्न पाहतोय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विषयही निघाला. तेव्हा सुशील मोदींनी नितीश कुमारांना सांगितले की, जेव्हा जेव्हा आमच्यात चर्चा होते तेव्हा मोदी तुमच्या कामाचं कौतुक करतात. ही गोष्ट ऐकून तेव्हा नितीश कुमारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2017 11:58 am

Web Title: nitish kumar narendra modi sushil kumar modi bjp jdu floor test in bihar assembly
Next Stories
1 सुषमाजी, तुम्ही आमच्या पंतप्रधान हव्या होतात!; पाकिस्तानी महिलेचं ट्विट
2 बिहार विधानसभेचा नितीश यांच्यावर ‘विश्वास’; १३१ मतांसह ठराव जिंकला
3 हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर लगेच अटक नको: सुप्रीम कोर्ट
Just Now!
X