नवी दिल्ली : दोन्ही देशात सध्या तणावाचे संबंध असताना अमेरिकेबरोबर आम्हाला वाटाघाटीत स्वारस्य नाही पण आम्ही राजनैतिक मार्गाने यावर मात करू इच्छितो असे मत इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद झरीफ यांनी रायसीना हिल्स संवादात व्यक्त केले. इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार मारले त्यानंतर इराणनेही अमेरिका व मित्र देशांच्या इराकमधील तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले त्यामुळे दोन्ही देशात तणाव आहे.

सुलेमानी यांना अमेरिकेने ठार मारले यातून त्यांचे अज्ञान व उर्मटपणा दिसून येतो. सुलेमानी यांना अमेरिकेने ठार मारल्यानंतर भारतातील ४३० शहरात त्याविरोधात निदर्शने झाली. इराणला राजनैतिक मार्गाने जाण्यात स्वारस्य आहे, अमेरिकेशी वाटाघाटी करण्याची आमची तयारी नाही. अमेरिकेने अणुकराराबाबतची आश्वासने पाळली नाहीत. आम्ही अमेरिकेशी अणुकरार केला व तो आता अमेरिकेनेच मोडला आहे. या सगळ्या प्रदेशात आशेचे वातावरण निर्माण करून निराशा झटकून टाकावी लागेल. आताच्या पेचप्रसंगाने इराणचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

सुलेमानीचा अमेरिकेकाल धोका नव्हता तर आयसिसला धोका होता तरी अमेरिकेने त्याला मारले. आयसिसने सुलेमानी मारला गेल्याची घटना साजरी केली तसेच अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही सुलेमानीला मारल्याचा आनंद साजरा केला.

युक्रेनचे विमान पाडल्याबाबत त्यांनी सांगितले की, ते नागरी प्रवासी विमान होते. पाडणे ही चूकच होती. इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डने ते मान्य केले आहे.