06 July 2020

News Flash

पाकिस्तानकडून गेल्या १२ तासांत तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानी सैन्याने रविवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीच्या नियमाचे उल्लंघन केले. गेल्या १२ तासांमध्ये पाकिस्तानी लष्कराने तिसऱ्यांदा नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर बेछूट गोळीबार केला आहे.

| August 17, 2014 12:51 pm

पाकिस्तानी सैन्याने रविवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीच्या नियमाचे उल्लंघन केले. गेल्या १२ तासांमध्ये पाकिस्तानी लष्कराने तिसऱ्यांदा नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर बेछूट गोळीबार केला आहे. नियंत्रण रेषेनजीकच्या जम्मू आणि पुंछ खोऱ्यात करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. पुंछमधील हमीरपूर भागात पाकिस्तानकडून सकाळी ८.४०च्या सुमारास स्वयंचलित शस्त्रांच्या सहाय्याने गोळीबार केल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली. यापूर्वी पहाटे तीनच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने आर.एस.पुरा आणि अर्निया भागातील भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरू केल्याने भारतीय जवानांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. पहाटे साडेपाच वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरू होता. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2014 12:51 pm

Web Title: pakistan violates ceasefire thrice in 12 hours
टॅग Firing,Jammu,Pakistan
Next Stories
1 गृहपाठ न केल्यामुळे सहा वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण
2 उत्तर प्रदेश दंगलीप्रकरणी सरकारचा अहवाल ; भाजपवर दोषारोप
3 भाजपचे नवे शहाबाज!
Just Now!
X