प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे सरचिटणीस पद देण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. प्रियंका गांधी यांचे नाव न घेता त्यांनी काही लोकांसाठी परिवारच पक्ष असतो, असे म्हटले. महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. काही लोकांसाठी परिवारच पक्ष आहे. आमच्यासाठी पक्ष हा परिवार आहे. आमचा विरोध काँग्रेसच्या संस्कृतीला आहे. काँग्रेसमुक्त देश याचा अर्थ काँग्रेसमुक्त संस्कृती असल्याचे ते म्हणाले.
PM Modi in interaction with BJP workers from Maharashtra: Hamari party main Koi bhi nirnaya iss baat se nahi hote hain ki ek vyakti ya ek parivaar kya chahta hai, aur isliye kaha jata hai ki desh main zyadatar cases mein parivaar hi party hai, lekin BJP main party hi parivaar hai pic.twitter.com/EhVbi8aLki
— ANI (@ANI) January 23, 2019
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे सरचिटणीसपद दिले. भाजपाच गड असलेल्या उत्तर प्रदेशचे प्रभारीपद ही प्रियंका यांना देण्यात आले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या कार्यभार स्वीकारतील.
प्रियंका गांधी या निवडणुकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रचार करायच्या. मात्र, त्यांच्याकडे पक्षात कोणतेही पद नव्हते. गेल्या काही वर्षांपासून प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाची धूरा सोपवण्याची मागणी केली जात होती. ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते.
PM Modi in interaction with BJP workers from Maharashtra: People who were forced to vote half-heartedly in favour of reservation to economically weaker section in general category, are now approaching courts. They never showed interest in taking positive initiatives themselves. pic.twitter.com/GOemg7cg5E
— ANI (@ANI) January 23, 2019
तर दुसरीकडे भाजपाने यावर टीका केली. प्रियंका गांधींचे निवडणुकीच्या रिंगणात आगमन झाल्याच्या घटनेचे वर्णन भाजपाने राहुल गांधींच्या अपयशावर झालेले शिक्कामोर्तब असे केले आहे.