20 February 2019

News Flash

भाजपाचे वाघ म्हणतात नरेंद्र मोदी विष्णूचा ११ वा अवतार

माझ्या मनात मोदींबाबत जी भावना आहे त्या भावनेतूनच बोललो आहे असेही अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नरेंद्र मोदी हे विष्णूचा ११ वा अवतार असल्याचं ट्विट केलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी या संदर्भातले ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे विष्णूचा अवतार असल्याचे म्हटले आहे. हिंदू संस्कृतीत ३३ कोटी देव आहेत, पंचमहाभुतं आहेत, भारतमातेला आपण देव मानतो. अगदी त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्याप्रकारे करत आहेत त्यामुळे आमच्यासाठी ते देवासमानच आहेत असेही वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच याच भावनेतून मी त्यांना विष्णूचा ११ वा अवतार म्हटलं आहे असंही त्यांनी सांगितलं.

प्रभू रामचंद्राने जन्म घेतला होता तो जगाच्या कल्याणासाठी त्याने रामराज्य आणले. कृष्णानेही देवकीच्या पोटी जन्म घेतला होता तसेच नरेंद्र मोदी हे आमच्यासाठी देवच आहेत असेही वाघ यांनी सांगितले. सगळ्यांसाठी चांगलं काम करणाऱ्या नरेंद्र मोदींना आम्ही देवच मानतो त्यात काहीही गैर नाही असंही अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे. आम्हाला मोदी भक्त म्हटलं जातं अंध भक्त नाही त्यामुळे जे बोललो आहे ते माझ्या मनात मोदींबाबत जी भावना आहे त्या भावनेतूनच बोललो आहे असेही अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे.

 

 

First Published on October 12, 2018 4:16 pm

Web Title: pm narendra modi is the 11th avatar of lord vishnu