यावर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त ९४२ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. यांपैकी २ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक (पीपीएमजी), १७७ कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्यपदके, ८८ कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर ६७५ कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदके जाहीर झाली आहेत.

महाराष्ट्रातील ८ कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्यपदक, ३ कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर ४० कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदके जाहीर झाली आहेत. पदक विजेत्यांची यादी http://www.mha.nic.in आणि pib.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

तर स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील ३६ तुरुंगाधिकाऱ्यांना सुधारक सेवा पदके प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. यात असामान्य सेवेसाठी राष्ट्रपती सुधारक सेवा पदक आणि उल्लेखनीय सेवेसाठी ३१ सुधारक सेवा पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील चौघांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारक सेवा पदके जाहीर झाली आहेत.

यामध्ये, कलप्पा मलकप्पा कुंभार (सुभेदार), येरवडा मध्यवर्ती कारागृह, कैलास शालिक बाऊस्कर (हवालदार), मुंबई जिल्हा महिला कारागृह, संजय राजारामजी तलवारे (शिपाई), नागपूर मध्यवर्ती कारागृहातून राजू विठ्ठल हाटे (शिपाई), नागपूर मध्यवर्ती कारागृह येथील तरुंगाधिकारी आणि पोलिस कर्चचाऱ्यांचा यात समावेश आहे.