महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरुवारी अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

यूजीसीने बुधवारी या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली. या पत्रकात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं म्हटलंय की, करोनाबाबत आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीचे सर्वांना पालन करावे लागेल. यामध्ये दोन मीटरचे अंतर राखणे, मास्क आणि आरोग्य सेतू अॅप अनिवार्य. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सर्दी, पडसे, ताप आणि करोना विषाणूचे दुसरी लक्षणं आहेत, त्यांना दुसऱ्या दिवशी परीक्षेला बसू द्यावे किंवा दुसऱ्या वर्गात बसून द्यावे याबाबत निर्णय घेणे, त्याचबरोबर परीक्षकांनाही मास्क आणि हातात ग्लोव्ह्ज घालणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी परीक्षा रद्द करण्याची भूमिका : उदय सामंत

दरम्यान, यूजीसीकडून बुधवारी या एसओपीचं पत्र देशातील ४० केंद्रीय विद्यापीठांना पाठवण्यात आलं आहे. यामध्ये म्हटलंय की, मनुष्यबळ विकास मंत्रालायनं ही एसओपी बनवली असून त्याला आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

इथे क्लीक करुन वाचा कार्यपद्धती (एसओपी)

युजीसीने जाहीर केलेली कार्यपद्धती (एसओपी)

  1. परीक्षार्थींना आरोग्याशी संबंधित एक सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरावा लागेल.
  2. प्रत्येक परीक्षा केंद्रावर थर्मोगन उपलब्ध असेल
  3. ज्या परीक्षार्थीने सेल्फ डिक्लरेशन फॉर्म आणि थर्मोगनने तपासणी केलेली नसेल त्यांना परीक्षा केंद्र सोडण्यास सांगण्यात येईल.
  4. परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टंसिंगचा विशेष पालन करण्यात येईल.
  5. त्याचबरोबर परीक्षार्थींना आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप अनिवार्य असेल
  6. परीक्षा केंद्रातील फरशी, दरवाजे, भिंती, फर्निचर, रेलिंग, जिना या सर्वांना निर्जंतुक केले जाईल.
  7. सर्व परीक्षा केंद्रांवर हँड सॅनिटायझर आणि हँडवॉश ठेवले जातील.
  8. येण्याच्या आणि जाण्याच्या जागी गर्दी करता येणार नाही.
  9. परीक्षेला उपस्थित असलेले परीक्षक, विद्यार्थी आणि इतर लोकांची नोंद केली जाईल, यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करता येईल.

परीक्षा केंद्रातील बैठक व्यवस्था अशी असेल

  1. परीक्षा हॉलमध्ये बसलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये एक बेंच रिकामा ठेवण्यात यावा
  2. दोन विद्यार्थ्यांच्यामध्ये २ मीटरचे अंतर असेल
  3. एका वर्गात चार रांगा असतील यामध्ये त्यांच्यामध्ये एका विद्यार्थ्याच्या जागेची रिक्त जागा असेल.