कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (रविवार) उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील दंगलग्रस्तांची भेट घेतली. मुझफ्फरनगर येथे सप्टेंबर महिन्यात दंगल पेटल्यानंतर येथील पीडित अद्यापही येथील निवारा केंद्रांमध्ये आहेत. या दंगलग्रस्तांना पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी मदत करण्याची तयारी यावेळी गांधी यांनी दर्शविली.
मात्र राहुल गांधींना यावेळी  दंगलग्रस्तांच्या प्रखर विरोधाचा सामना करावा लागला. कांधला येथे दंगलग्रस्तांनी राहुल गांधींच्या गाडीचा ताफा अडवत त्यांना काळे झेंडे दाखवले.   दंगलग्रस्तांसाठी सरकारने पुरेश्या सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत असा आरोप या दंगल पिडीतांनी केला आहे.