19 September 2020

News Flash

राहुल गांधी माझे नेते नाहीत; प्रियंका गांधींनी राजकारणात यावे-हार्दिक पटेल

राहुल गांधी यांचे विचार मला पटतात पण ते माझे नेते नाहीत

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे माझे नेते नाहीत. व्यक्तिगत पातळीवर मला ते आवडतात. त्यांचे राजकारणही मला पटते, त्यांचे विचारही पटतात,  पण ते माझे नेते नाहीत, अशी प्रतिक्रिया पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी दिली आहे. मुंबई आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. इतकेच नाही तर प्रियंका गांधी यांनी राजकारणात आले पाहिजे अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली. प्रियंका गांधी यांची देशाच्या राजकारणात कधी एंट्री होणार याची वाट मी पाहतो आहे असेही पटेल यांनी म्हटले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर या तिघांनीही राहुल गांधींच्या साथीने भाजपला काँटे की टक्कर दिली होती. तसेच हार्दिक पटेलने पाटीदार समाजाचे प्रश्न मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात शड्डू ठोकला होता. आता मात्र राहुल गांधी यांना मी माझे नेते मानत नाही असे स्पष्टीकरण हार्दिक पटेल यांनी दिले आहे.

गुजरातच्या पाटीदार समाजाचच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मी आंदोलन सुरु केले. त्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये मला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्या पाटीदार समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस भाजपाला काँटे की टक्कर देऊ शकला कारण त्यांच्या साथीला हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर होते. गुजरातच्या जनतेने काँग्रेसलाही बरोबरीने मतदान केले हे पाहून आनंद झाला. काँग्रेस विरोधी पक्षात बसल्याने गुजराती लोकांचे प्रश्न आता सक्षमपणे हाताळले जातील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 8:45 am

Web Title: rahul gandhi is not my leader want priyanka to join politics hardik patel
Next Stories
1 बॉम्बस्फोटाने सोमालिया हादरलं; १८ जण जागीच ठार, २० जखमी
2 एकत्रित निवडणुका घेणे अवघड – प्रणब मुखर्जी
3 मध्य प्रदेशात तलवारीने युवतीची निर्घृण हत्या
Just Now!
X