News Flash

वाढदिवशीच मुलाचे निधन, कॉमेडियन राजीव निगमची भावूक पोस्ट

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती..

आपल्या अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना हसवणारे कॉमेडियन राजीव निगम यांच्या मुलाचे निधन झाले आहे. राजीव यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

राजीव निगम यांचा मुलगा देवराजचे ८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले आहे. पण देवराजच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. काल राजीव यांचा वाढदिवस देखील होता. त्यांच्या वाढदिवशी मुलाचे निधन झाले आहे.

राजीव यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘वाढदिवशी अशी भेट कोणी देतं का? माझा मुलगा देवराज आज मला सोडून गेला. माझ्या वाढदिवसाचा केक न कापताच गेला’ या आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

राजीव यांनी ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत काम केले आहे. तसेच कॉमेडी सर्कस के अजूबे, कॉमेडी सर्कस का जादू, कॉमेडी सर्कस के सुपरस्टार, ये तो होना ही था अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 12:09 pm

Web Title: rajeev nigam son devraj passed away on his birthday avb 95
Next Stories
1 पराभव आता मान्य करा, डोनाल्ड ट्रम्प यांना पत्नीचा सल्ला
2 सरकारी काम… रस्ता बांधला पण नदीवरील पूल बांधायला विसरले; १५ वर्षांपासून जीव मुठीत घेऊन स्थानिक करतात प्रवास
3 “बकरी ईद ज्या दिवशी बकऱ्याशिवाय साजरी होईल, तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करु”
Just Now!
X