भारत-म्यानमार सीमेवरून आसाम रायफल्सला मागे घेणार नाही किंवा त्यांच्या जागी दुसरी निमलष्करी दले तैनात करण्याचाही विचार नाही, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
आसाम रायफल्सच्या १८१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सैनिक संमलेनानंतर त्यांनी सांगितले की, आम्ही याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही, जेव्हा आम्ही काही निर्णय घेऊ तेव्हा तुम्हाला सांगू.
याआधी तेथे सीमा सुरक्षा दल तैनात करण्याचा विचार होता व त्यासाठीचा आढावा अहवालही तयार करण्यात आला आहे. भारत व म्यानमार यांच्यात १६४३ कि.मी. ची सीमा कुंपणविरहित आहे. आसाम रायफल्सची स्थापना १८३५ मध्ये करण्यात आली होती.