टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेल्या सायरस मिस्त्रींनी टाटा कन्सलटन्सी सव्हिसेसचे (टीसीएस) नुकसान केल्याचा आरोप फेटाळत रतन टाटा यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. रतन टाटा यांनीच टीसीएस विकायला काढली होती, असा आरोप त्यांनी केला आहे. मिस्त्री यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात त्यांनी हा आरोप केला आहे. टीसीएस आणि जेएलआर कंपनीच्या यशात आपले योगदान नसल्याचा आरोप चुकीचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
पत्रकात म्हटले आहे, एकदा रतन टाटा हे टीसीएस खरेदी करण्याचा आयबीएमचा प्रस्ताव घेऊन जेआरडी टाटांकडे गेले होते. त्यावेळी टीसीएसचे तत्कालीन प्रमूख एफ. सी. कोहलींची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे जेआरडींनी आयबीएमबरोबरील व्यवहारासंबंधी बोलण्यास नकार दिला होता. रूग्णालयातून सुट्टी मिळताच कोहलींनी जेआरडींना टीसीएसचे भविष्य उज्वल आहे टाटा ग्रूपने विकण्याचा विचार करू नये अशी विनंती केली होती. त्यानंतर जेआरडींनी आयबीएमचा प्रस्ताव फेटाळला होता. त्यामुळे रतन टाटा यांचा टीसीएस विकण्याचा प्रयत्न फसल्याचे पत्रकात म्हटले आहे.

टीसीएसची क्षमता वाढवण्यासाठी जगभरातील सुमारे ६० सीईओंची मिस्त्रींनी भेट घेतली होती. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच टीसीएसने विशेष लाभांश दिला होता. त्याचबरोबर मिस्त्रींनी अमेरिका आणि यूरोपमध्ये झालेल्या ग्राहक परिषदेतही सहभाग नोंदवला होता. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या बैठकीतही ते भाग घेणार होते, अशी माहितीही पत्रकात देण्यात आली आहे.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
bhiwandi highway robber marathi news
भिवंडीतून ‘हायवे राॅबर’ ताब्यात, पिस्तुल, मिरचीपूडसह शस्त्रास्त्र जप्त

तत्पूर्वी, मिस्त्री यांनी कंपनी आणि समभागधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, असे टीसीएसने म्हटले होते. कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर केलेल्या अहवालात टीसीएसने मिस्त्रींनी नुकसान केल्याचे नमूद केले होते.
टीसीएसच्या अहवालानुसार, टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर मिस्त्रींनी अनेक खोटे आरोप केले. या आरोपांमुळे टाटा सन्ससह बोर्डाच्या संचालकांचीही प्रतिमा मलिन झाली. तसेच टाटा समूहाचेही मोठे नुकसान झाले आहे. टीसीएस ही कंपनी या समूहातील एक कंपनी आहे. टीसीएसने बीएसईकडे सादर केलेल्या अहवालात पुढील सर्वसाधारण सभेच्या आयोजनाबाबतही कळवले आहे.
यापूर्वी टीसीएस कंपनीने मिस्त्री यांच्या जागी इशात हुसैन यांची संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. याआधी टाटा सन्सने पदावरून हटवलेल्या अध्यक्षांनी सर्व कंपन्यांच्या पदावरून राजीनामा द्यायला हवा, असे म्हटले होते.