आम्हाला राज्यघटनेवर विश्वास आहे. कोणत्याही सत्ताकेंद्रावर आम्ही विश्वास ठेवत नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. कोणाच्याही धर्माला धक्का लागला जाऊ नये. देशातील १३० कोटी जनता ही हिंदूच असल्याचं आम्ही मानतो, असंही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ”संघाचे स्वयंसवेक जेव्हा म्हणतात की हे हिंदुराष्ट्र आहे आणि देशातील १३० कोटी जनता हिंदू आहे, याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाचा धर्म, जात आणि भाषा बदलू इच्छितो. आम्हाला राज्यघटनेशिवाय इतर कोणतेही सत्ताकेंद्र नकोय. कारण आमचा राज्यघटनेवर विश्वास आहे.”

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलनं झाली. त्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी हे मत मांडलं आहे. ”सर्व भारतीय हिंदूच आहेत,” असं त्यांनी गेल्या महिन्यात तेलंगणातील एका कार्यक्रमातही केलं होतं. त्याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला.

”भावनिकरित्या एकत्र राहण्याचा प्रयत्न करा, असं आपल्याला राज्यघटना सांगते. पण ही भावना कोणती? कोणत्या भावनेनं एकत्र यायचं? ती म्हणजे – हा देश आपला आहे आणि विविधतेत एकदा हा आपल्या पूर्वजांचा वारसा आपण चालवतोय. अशीच भावना आपल्या मनात असायला हवी. हेच तर हिंदुत्व आहे,” असंही भागवत यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी भागवत म्हणाले होते का…
संघाच्या स्वयंसेवकांना मुरादाबाद येथे शनिवारी मार्गदर्शन केले. त्यावेळी भागवत म्हणाले की, ”आरएसएस हा काही भाजपाचा रिमोट कंट्रोल नाही. संघाचा कोणत्याही राजकारणाशी संबंध नाही. संघ केवळ देशातील सांस्कृतिक व नैतिक मानवी मूल्ये आणि लोकांमधील विश्वास वाढवण्यासाठी काम करते.”